मुंबई शहराच्या स्वच्छतेमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व मुंबई शहरास अस्वच्छते पासुन स्वातंत्र्य देणाऱ्या कचरा वेचक महिलांसाठी एक वेगळीच दिवाळी असावी याचं अनुषंगाने संजय निरुपम शनिवार दि. ११ नोव्हेंबर, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता, अण्णा भाऊ साठे मैदान, लिंक रोड, गोरेगाव पश्चिम येथे कचरा वेचक महिलांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
मुंबई शहराच्या स्वच्छतेत खारीचा वाचा उचलणाऱ्या कचरा वेचक महिला म्हणजे परिसर भगिनी, स्वतःची घरे स्वच्छ करुन शहर स्वच्छतेसाठी घरोघरचा कचरा उचलणे तो वेगळा करणे हेच आयुष्य रोज पाहणाऱ्या कचरा वेचक महिलांसाठी संजय निरुपम यांच्याकडून दीपावलीची अनोखी भेट देण्यात येणार आहे.
तसेच सदर कार्यक्रमात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाड परिसरातील शेकडो कचरा वेचक महिला म्हणजे परिसर भगिनी उपस्थित राहणार आहेत.