shahrukh Khan | किंग खान शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवशी त्याचे अनेक चाहते सोशल मीडियावरुन त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याची प्रसिद्ध देशातच नाही तर परदेशातही आहे. हा असा कलाकार आहे जो आजही चित्रपटात रोमांस करताना दिसतो. शाहरुखच्या रोमांसचा आजही अनेक चाहतावर्ग आहे. मधल्या काळात शाहरुखच्या चित्रपटांना प्रेक्षकांची म्हणावी तशी प्रसिद्ध मिळत नव्हती. पण तरीही त्याने चित्रपटात काम करणे काही सोडले नाही आणि मुळात Centre Of attraction असलेल्या अशा भूमिका सोडल्या नाहीत. चला जाणून घेऊयात शाहरुखच्या चित्रपटाच्या हिट होण्यामागील ही काही कारणं
चित्रपटांची निवड Shahrukh Khan
गेल्या काही वर्षांपासून शाहरुखच्या भूमिका या केवळ एक रोमँटिक हिरो अशा राहिलेल्या नाहीत. त्याने विविधांगी चित्रपट करायला घेतले आहेत. नुकताच आलेला त्याचा ‘जवान’ हा चित्रपट त्याचे एक उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याने यात साकारलेल्या दोन्ही भूमिका या फारच वेगळ्या आहेत. त्याचा अभिनयही या दोन्ही भूमिकांसाठी वेगळा आहे असे दिसून येते. एरव्ही शाहरुख म्हणजे आपण क कककक किरण… असेच ओळखतो. पण त्यात त्याचा अभिनय नक्कीच त्याच्या वयाला साजेशा आहेत. त्यामुळेच त्याचे चित्रपट आता पुन्हा चालू लागले आहेत.
रोमँटिक भूमिकेतून थोडा बाहेर
सध्याच्या सीरिजच्या काळात खूप जणांना रोमँटिक चित्रपटाचा कंटाळा येऊ लागला आहे. त्यात बॉलिवूडच्या लव्हस्टोरीज या हल्ली खूपच रटाळ होऊ लागल्या आहेत की काय असे वाटते. गाणे मग नाच आणि त्यानंतर प्रेम हा असा पॅटर्न ठरला आहे. पण शाहरुख हल्ली ऑनस्क्रिन रोमांस करताना दिसत नाही आणि असेल तर तो कमीच असतो. त्यामुळेही त्याला चाहत्यांची नस कळली आहे असे म्हणावे लागेल. चक दे इंडिया, पठाण, रईझ यामध्ये त्याच्या भूमिकांना वेगळी झालर असलेली दिसून आली आहे.
घेतलेली मेहनत
शाहरुख खान आज एक यशस्वी अभिनेता आहे. पण आजही त्याच्या भूमिकांसाठी तो खूप जास्त मेहनत करताना दिसतो. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायला हवे म्हणून त्याचा फिटनेसही त्याने चांगला राखला आहे. तो स्क्रिनवर इतर कोणत्याही कलाकारांमध्ये नक्कीच उठून दिसतो. आता मेकअप आणि एडिटींगने त्याला कितीही तरुण दाखवता येणे शक्य असले तरी देखील तो फिटनेसच्या बाबतीत ओम शांत ओम या चित्रपटापासून फारच मेहनत करताना दिसतो.
टॉप अभिनेत्रींसोबत केलेय काम
शाहरुख हा असा अभिनेता आहे. ज्याने आतापर्यंत सगळ्या अभिनेत्रींसोबत काम केलेले आहे. इंडस्ट्रीत आलेल्या नव्या असो की प्रसिद्धीच्या मीटरमध्ये बसणाऱ्या अशा सगळ्यांसोबत त्याने स्क्रिन शेअर केली आहे. त्याने ज्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत त्याची ऑनस्क्रिन केमिस्ट्री देखील अधिक चांगली दिसून आली आहे. त्यामुळेही तो सगळ्यांच्या पसंतीस उतरतो.
आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे चाहते त्याच्या घराबाहेर गर्दी करुन उभे असतील. पण ही गर्दी जमवण्यासाठी त्याने खूपच मेहनत केली आहे यात काहीही शंका नाही.