सीताहरणसीताहरण

Ramayan मधील कथा आपल्यापैकी कित्येक जणांनी वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील. जर तुम्ही संपूर्ण रामायण वाचले असेल तर सीता हरण हे का झाले? याचे कारण तुम्हाला नक्कीच माहीत असेल. शिवाय सीतेने अग्निपरिक्षा का दिली हे देखील आपण जाणत असाल. परंतु ज्यांना याची माहिती नाही त्यांना असे वाटते की, मर्यादा पुरुषोत्तम असूनही आपल्या पत्नीचा सन्मान करण्यास कुठेतरी ते चुकले किंवा आपल्याकडे काही गोष्टींची उत्तर नसतात. अशावेळी तुम्हाला रामायणातील खरी गोष्ट माहीत असायला हवी. सीता हरणामागील कथा काय आहे हे आज आपण आज या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

सीताहरणामुळेच तर घडले रामायण Ramayan

रावण हा शंकर भक्त होता हे आपण सगळेच जाणतो. तो राक्षसकुळातील असला तरी त्याने परमपिता ब्रम्हाकडून असा वर मागून घेतला होता की, ज्यामुळे त्याला हरवणे कोणालाही शक्य होत नव्हते. त्यामुळे देव-दानव सगळेच घाबरुन गेले होते. त्याने त्याच्या वराचा गैरफायदा घेऊन देवकुळाला त्रास देणे सुरु केले होते. अखेर सगळ्यांनी भगवान शिवाची आराधना केली. त्यांना या समस्येतून तुम्हीच वाचवू शकता असे सांगितले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, भगवान विष्णूचा अवतार असलेले प्रभू राम लवकरच अयोध्येमध्ये जन्माला येणार आहेत. त्यांच्या हातूनच रावणाचा संहार होणार आहे. त्याचा संहार होण्यासाठीच विविध गोष्टी घडणार आहेत. असे सांगितल्यानंतर काही काळात राजा दशरथाला मुलगा झाला. तेच प्रभू रामचंद्र… ज्यांना लग्नानंतर काही कारणास्तव 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. या वनवासात असताना रावण सीतेचे हरण करायला येणार हे निश्चित होते. त्यामुळेच पतिव्रता असलेल्या सीतेला अग्निदेवाकडे सोपून अग्नितून एक समसीता तयार करण्यात आली. ज्यावेळी रावणाने सीतेचे हरण करण्याचे निश्चित केले त्यावेळी समसीता त्या ठिकाणी होती. तिचे हरण रावणाने केले. परंतु त्याला हे कधीच लक्षात आले नाही. रावणाचा अंत हा अटळ निश्चित होता. त्यामुळे संपूर्ण वानरसेना घेऊन रामाने रावणावर हल्ला चढवला. त्यानंतर रावणाच्या वधाची गोष्ट तर आपण जाणतोच.

Lord Shri Ram Names | प्रभू श्री रामावरुन मुलांची नावे 2024

अग्निपरिक्षा नाही तर अग्नितून आली सीता

खूप ठिकाणी राम हा किती दुष्ट होता हे दाखवण्यात आले. परंतु प्रत्यक्षात रावणाचा वध ज्यावेळी झाला त्यानंतर एक अग्नि प्रज्वलित करण्यात आला. त्यातून अग्निदेवतेने खऱ्या सीतेला बाहेर पाठवले आणि समसीतेला आपल्यामध्ये सामावून घेतले. त्यामुळे सीतेचे पावित्र्य हे टिकून राहिले. त्यामुळे रामाने सीतेला अग्निपरिक्षा द्यायला लावली हे फारच चुकीचे आहे. जर कोणी असा गैरसमज केला असेल तर तुम्ही तो दूर करा.

या सगळ्या गोष्टी रामायणात उल्लेखलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *