दगडूला मिळाली त्याची प्राजूदगडूला मिळाली त्याची प्राजू

‘टाईमपास’ या मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब (Prathmesh Parab) याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. व्हेलेंटाईन्स डेच्या दिवशी त्याने गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. त्याने त्याच्या साखरपुड्याचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी आनंद व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अखेर दगडूला त्याची प्राजू मिळाली अशी प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिली आहे.

कोणताही मोठा थाटमाट न करता मराळमोळ्या आणि पारंपरिकपद्धतीने आपल्या नातेवाईकांच्या उपस्थित प्रथमेशने आणि क्षितिजाने साखरपुडा केला आहे. 14 फेब्रुवारी या तारखेचे या दोघांच्या आयुष्यात खूप जास्त महत्व आहे. कारण 14 फेब्रुवारी 2022 मध्ये क्षितिजाची व्हेलेंटाईनवरील एक सीरिज पाहून प्रथमेशने तिला मेसेज केला यानंतर त्यांचे बोलणे सुरु झाले आणि ते एकमेकांना डेट करु लागले. त्यानंतर बरोबर एक वर्षांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी त्यांचे नाते ऑफिशिअल केले आणि या वर्षी याच तारखेला त्यांनी साखरपुडा केला आहे.

प्रथमेश आणि क्षितिजा यांचा लुकही अगदी साधा आणि सुटसुटीत होता. प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न अटायर केला आहे. तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची पैठणी नेसली आहे. हे दोघेही त्यांच्या खास दिवशी त्यांच्या लुकमुळे अधिक फ्रेश आणि आकर्षक दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *