त्वचेच्या समस्यांनी हल्ली अनेक जण त्रस्त आहे. केवळ पौंगडावस्थेत पिंपल्स येतात असे आता मुळीच राहिले नाही तर पिंपल्सचा त्रास हा आता सर्रास होताना दिसत आहे. त्यात लाईफस्टाईल ही आलीच परंतु त्याहूनही अधिक आता या सगळ्या गोष्टींसाठी प्रदूषण जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. आजुबाजूला वाढलेल्या प्रदुषणाचा परिणाम हा आता सगळ्यांच्यात त्वचेवर दिसून लागला आहे. त्वचा काळवंडणे, त्वचेवर बारीक बारीक पुळ्या येणं, त्वचा निस्तेज दिसणे असे त्रास सध्या अनेकांच्या त्वचेवर दिसत आहे. यावर कितीही इलाज केले तरी देखील त्याचा त्रास हा होतोच असे देखील दिसून आले आहे. जाणून घेऊया यासाठी नेमकं काय करायला हवं.
प्रदूषणापासून असे करा त्वचेचे संरक्षण
आता प्रदूषण हे टाळणे आपल्यासाठी तसे काही शक्य नाही. कारण कामासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी आपल्याला घराबाहेर पडणे आलेच. अशावेळी तुमच्या त्वचेवर प्रदूषणाचा परिणाम होतो. वाढत्या गाड्या, तापमान, बांधकाम आणि तेथील धूळ यामुळे होते असे की,त्वचेवर त्याचा थर कधी साचतो हे काही कळत नाही. ते जर त्वचेवर तसेच राहिले तर पुढे जाऊन त्याचे पर्यवसान हे त्वचेच्या समस्यांमध्ये होते.
यात प्रामुख्याने त्वचेवर बारीक बारीक पुळ्या येऊ लागतात. सुरुवातीला त्या पुळ्या इतक्या दिसत नाही. त्यात पस साचलेला आहे तो कळत नाही. पण जशा त्या पुळ्या कडक होऊ लागतात. त्यावेळी मात्र त्या त्वचेवर दिसू लागतात.
अशी घ्या त्वचेची काळजी
- कोणताही मेकअप करताना त्वचेला उत्तम मॉश्चरायझर लावायला अजिबात विसरु नका. मॉश्चरायझर आणि सनस्क्रिन लावल्यानंतरच तुम्ही मेकअप करा.
- बाहेर फिरताना त्वचा जितकी झाकता येईल तितकी झाका. त्वचेसाठी स्कार्फ वापरला तरी देखील चालू शकतो.
- घरी आल्यानंतर मेकअप स्वच्छ करा. सध्या डबल क्लिन्झिंगसाठी विविध प्रोडक्ट मिळतात त्याचा वापर करायला मुळीच विसरु नका.
- त्वचेची काळजी घेताना महिन्यातून एकदा फेशिअल करायला विसरु नका. कारण त्यामुळे त्वचेवरील रक्तप्रवाह उत्तम होतो.
- त्वचेची काळजी घेण्यासाठी उत्तम फेसवॉश, फेससीरम याचा वापर करायलाही अजिबात विसरु नका.
आता प्रदूषणाचा काही विचार करण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात कसे करता येईल ते बघा