येत्या काही महिन्यांमध्ये अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये ट्रेन बोलवून एखाद दुसऱ्या ट्रेनवर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खोचक टीका केली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहे का? असा सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “सर्व भारतीय राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची आतुरतेनं वाट बघत आहे. एकीकडं या कार्यक्रमाला हजारो रामभक्त उपस्थित राहणार आहे. तर दुसरीकडं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दंगली घडवण्याच्या गोष्टी करत आहे. हिंदूंचे कोणतेही सण उत्सव आले की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात.
मात्र, हज यात्रा किंवा मुस्लिमांच्या सणांच्या वेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काहीही बोलत नाही. यावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पाकिस्तानी एजंट आहे का? असा संशय आता मला वाटत आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अशा प्रकारची विधान करणं अत्यंत मूर्खपणा आहे.
हा राजकारणाचा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला प्रत्येक भाविक आनंदानं आणि उत्साहानं उपस्थित राहणार आहे.बॉम्ब ठेवणार आहे, हल्ले होणार आहे, असं म्हणणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. यासाठी मी आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.” असं नितेश राणे यांनी यावेळी नमूद केले आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा आणि पाहा व्हिडिओ