मुंबई – भंडारा जिल्ह्यात काही नाचणाऱ्या स्त्रियांना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडून त्यांच्यावर पैसे उधळल्याचे धक्कादायक व्हिडीओ उभ्या महाराष्ट्रात नुकताच व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असतानाच याची गंभीर दखल राज्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत. तर त्याचवेळी यासारख्या घटना पुन्हा घडू नये म्हणून ठोस उपाययोजना आखण्याची सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील नाका डोंगरी भागामध्ये आणि त्याचबरोबर मोहाडी तालुक्यातल्या बीड या ठिकाणी १७ नोव्हेंबर रोजी महिलांना नाचत असताना विवस्त्र करणे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर पैसे उधळण हा प्रकार घडला त्याचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. याप्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांच्याशी दुरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी काही राजकीय नेते सुद्धा सापडलेले असल्याने समोर आले आहे.
याप्रकरणी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, डान्सबार विरोधी कायदा झाला त्याच्यात सुद्धा अनेक बंधन घालण्यात आली होती. सामान्य लोकांचा सहभाग ज्या कार्यक्रमात असतो त्यावेळेस अशा पद्धतीने लोकांनी महिलांना मजबूर करून त्यांचं लैंगिक शोषण करण किंवा त्यासारखं गुन्हे करणं हे अत्यंत चिड आणणारी घटना आहे. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा सामाजिक भान आणि कायद्याची बुज राखली गेली पाहिजे असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.