american nightmareamerican nightmare

Netflix Series 2024 मध्ये काही नवे पाहायचे असेल तर तुमच्यासाठी एक खास सीरिज आली आहे असे समजा. सत्य घटनेवर आधारीत अशी ही सीरिज सध्या अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. अमेरिकेतील एका सर्वसामान्य जोडप्यासोबत ती घडली आहे. ही घटना अशी होती की त्यामुळे अमेरिकेतल्या पोलीसप्रशासनावर शंका उपस्थित झाली. 2015 साली डेनिस हस्किन आणि ॲरॉन क्विनसोबत ती घडली आहे. या सीरिजमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या घटनांचे खरे फुटेज आणि माहिती आहे त्यामुळे यात अधिक गुंतायला होते. कोणतीही बातमी न वाचता तुम्ही जर ही सीरिज पाहिली तर ती तुम्हाला नक्कीच अंगावर काटा आणेल.

अचानक एका रात्री झाले अपहरण

डेनिस आणि ॲरॉन दोघेही काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. एक दिवस अचानक त्यांच्या घरी चोरीच्या इराद्याने एक व्यक्ती आली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्याने या दोघांवर हल्ला केला. डेनिस आणि ॲरॉनचे हात बांधले. या दोघांना नशेच्या गोळ्या देऊन त्याने डेनिसचे अपहरण केले. नशेच्या गोळ्या दिल्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडला काहीही करता येत नाही. पण तिचे अपहरण झाले हे त्याच्या लक्षात असते. दुसऱ्या दिवशी नशेच्या गोळ्यांचा परिणाम उतरल्यानंतर तिला तो काही काळ वाट पाहतो आणि मग पोलिसांना तक्रार करतो. अपहरणाच्या या प्रकरणात पहिला संशय हा ॲरॉनवर असतो. त्यामुळे त्याची कसून चौकशी होते. पण तो शेवटपर्यंत मी हे केले नाही असेच सांगतो.

अपहरणाच्या या प्रकरणांमध्ये अपहरण झालेली व्यक्ती कधीही परत येत नाही हे अनेकदा दिसले आहे. परंतु दोन दिवसांनी डेनिसला अपहरणकर्त्याने सोडून दिले? तिला पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. इंग्रजी चित्रपट Gone Girl सारखी ती परत आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर वेळ आणि मेहनत वाया घालवल्याचे आरोप केले. परंतु खरे प्रकरण काहीतरी वेगळेच होते. तिचे अपहरण खरेच झाले होते. पण तिच्यासोबत जे घडले ते ऐकल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल. पण हे कसं शक्य आहे असे देखील वाटेल.

दोषमुक्त होण्यास लागला वेळ

डेनिस आणि ॲरॉन दोषी नव्हते त्यांनी कसलाही कांगावा केला नव्हता. परंतु काही काळ त्यांना याचा सामना करावा लागला.यामध्ये केवळ त्यांचीच चुकी असल्याचे सांगितले जात होते. पोलिसांच्य चुकीच्या शोधमोहिमेमुळए आणि स्वार्थामुळे हे सारे घडले होते. याचा उलगडा करणारी ही सीरिज आहे.

जर तुम्हाला क्राईम सीरिज आवडत असतील तर तुम्हाला ही सीरिज नक्की आवडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *