राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची आज नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे पक्ष कार्यालयात देण्यात आली.
संजय पवार आणि अभिषेक पाटील हे पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी निश्चित सहकार्य करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.