गणेशोत्सव आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतका जवळ आला आहे. खास या सणासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असते. हे लक्षात घेऊन या काळात अनेकदा जादा ट्रेन आणि बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. यंदाही भाविकांची गर्दी लक्षात घेत भाजपकडून तब्बल 6 जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती नितेश राणे (Nitesh Rane, MLA) यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांनी केलेले ट्विट हे विरोधी पक्षाला टार्गेट करुन केलेले आहे असे म्हटले तरी काही हरकत नाही.
नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात त्यांनी या जादा गाड्यांची माहिती देताना म्हटले आहे की,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो एक्सप्रेसला झेंडा दाखवण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर रोजी दादर स्थानकातून रात्री 9वाजून 45 मिनिटांनी कोकणासाठी पहिली गाडी सुटणार आहे. त्यामुळे आता कोकणाची आस असणाऱ्या भाविकांना या जादा गाडीतून प्रवास करणे सोपे जाईल.
इतकेच नाही तर ज्यांना ट्रेनचा प्रवास करणे शक्य नसेल अशांसाठी जादा 300 बसेस देखील सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बसने देखील कोकणवासियांना जाता येणार आहे. सणोत्सवांना चालना मिळावी यासाठी ‘मुंबईचा मोरया’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातही या उत्सावाचा आनंद तितक्यात उत्साहात साजरा करता येईल.