नागिण आजारनागिण आजार

Nagin हा त्वचारोगाचा एक प्रकार आहे. याविषयी शहरांमध्ये फारसे बोलले जात नाही. कारण हा सर्वसामान्यपणे होणारा असा आजार नाही. परंतु अशाप्रकारचा त्रास झाल्यानंतर काही घरगुती औषधांनी म्हणजेच आयुर्वेदिक उपचारपद्धतींनी यावर आराम मिळवता येतो. हा आजार होण्यामागे काही अंधश्रद्धा जरुर आहेत. पण त्यामागे असलेले विज्ञान हे देखील आपल्याला माहीत असायला हवे. डॉक्टरांच्या अभ्यासानुसार हा त्रास कधी होतो आणि त्यापासून आपल्याला आराम कसा मिळू शकतो. याची माहिती आज आपण घेणार आहोत.

नागिण म्हणजे काय?

नागिण म्हणजे काय?

नागिण या आजाराला Herpes Zoster असं म्हणतात. हा त्वचा प्रकारातील एक आजार असून हा आजार अगदी कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. त्वचा रोगाशी निगडीत असा आजार असल्यामुळे याला बरे होण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो. हा आजार लगेच बरा होईल असे नाही. त्यामुळे थोडासा डाऊन टाईम हा या आजारासाठी आहेच. परंतु हा आजार जीवघेणा असतो असे जर तुम्हाला कोणी सांगितले असेल तर ते साफ खोटे आहे. यापासून जिविताला कोणत्याही प्रकारचा धोका उद्धभवत नाही. त्यामुळे जर काही कल्पना या आजाराच्या बाबतीत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा. खूप जण म्हणतात की या आजारात प्राण जाण्याची शक्यता असते. ही या नागिणीने जर तुम्हाला विळखा घातला तर त्या व्यक्तिला मरण येते असे अजिबात नाही. त्यामुळे घाबरुन कोणतेही अघोरी उपाय करायला जाऊ नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Back Pain कडे करु नका अजिबात दुर्लक्ष, असू शकतात याचे संकेत

नागिणची लक्षणे कोणती? Symtoms Of Nagin

तुम्हाला नागिण या आजाराची बाधा झाली असेल तर तुम्हाला काही लक्षणे ही नक्कीच जाणवतील. अशी लक्षणे जाणवू लागली की, त्याकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरु शकते.

  1. थंडी भरुन ताप येणे, डेकेदुखी होणे
  2. थकवा आणि सततची पोटदुखी
  3. त्वचा लाल होणे आणि त्वचेवर काही ठिकाणी फोड येणे
  4. फोडांमध्ये पाणी भरणे आणि ते लालसर दिसून खूप दुखू लागणे

अशी काही लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.

नागिण येण्यामागे ही कारणेही

नागिण हा त्वचा रोगाचा एक प्रकार आहे. असे सांगितले जाते की, ज्यावेळी तुम्हाला कांजिण्या (Chicken Pox) येतात. त्यानंतर तेे बरे झाल्यानंतरही तुमच्या शरीरात त्याचे जीवाणू असतात. जे पुढे जाऊन तुम्हाला नागीण होण्याची शक्यता असते. असे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. जर तुम्ही नागिणची योग्य काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन त्यामुळे नागिण होऊ शकते.

नागिण उपचारपद्धती

पूर्वीप्रमाणे नागिण हा आता केवळ झाडपाल्याने बरा होणारा आजार राहिला नाही. याचा अर्थ औषधी पाल्यांनी तो बरा होत नाही असा नाही. परंतु डॉक्टरांचा सल्ला हा नेहमीच यासाठी महत्वाचा ठरतो. डॉक्टरांकडे वेळीच गेल्यावर ते त्यावर लावण्यासाठी मलम आणि इतर त्रासांसाठी पोटातून काही औषधे देतात. ज्यामुळे तुम्हाला खाज, जळजळ कमी होण्यास मदत मिळते.

आता कोणाला जर असा त्रास असेल तर तुम्ही योग्यवेळी योग्य उपचार करा, घाबरुन किंवा मरणाच्या भीतीने डॉक्टरकडे जाणे टाळू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *