Mumbai University मुबंई विद्यापीठ आणि गोंधळ हे अगदी ठरलेले आहे. अनेकदा या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना भोगावा लागला आहे. आता आणखी एका गोंधळामुळे विद्यापीठाच्या कारभारावर अनेक जण नाराज होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या M.Com च्या परिक्षेचा निकाल लावण्यास विद्यापीठाला विसर पडला आहे असेच दिसत आहे. विद्यापीठाच्या आयडॉल विभागाच्या एम. कॉमच्या चौथ्या सत्राची पेपर तपासणी पूर्ण झाली. पण तिसऱ्या सत्राचे पेपरच तपासून झाले नाही हे विद्यापीठाच्या निदर्शास आले.त्यामुळे 10 हजारहून अधिक पेपर हे तपासण्याचे शिल्लक आहेत.
M.Com च्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्राची परीक्षा ही अनुक्रमे मार्च आणि जुलै महिन्यात पार पडली. या दोन्ही परीक्षांचा निकाल हा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. याचा परिणाम हा पीचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शिवाय तृतीय सत्रात एखादा पेपर राहिल्यास पुर्नतपासणी आणि मुल्यांकन यावरही परिणाम होणार आहे.
विद्यापीठात या संदर्भात विचारणा केल्यानंतर ज्या कंत्राटदाराने पेपर तपासून द्यायचे होते. त्यांनी ते अद्याप तपासून दिले नसल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. शिवाय पेपरतपासणी अंतिम टप्प्यात आली आहे. पण निकाल कधी लागणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
त्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही. तोपर्यंत तरी मुलांवर टांगती तलवार आहे असेच म्हणावे लागेल.