Mumbai Indians जो दणकून पराभव झाला. त्यानंतर अनेक मुबंई इंडियन्सच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे. पण या सगळ्याचे खापर आता या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या(Hardik Pandya) याच्यावर गेले आहे. मॅच जिंकण्यासाठी जो अटीतटीचा सामना सुरु होता. त्यात हार्दिक कुठेतरी कमी पडत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले होते. मॅच कर्णधार म्हणून चुरशीची व्हायला हवी होती. पण त्याचवेळी त्याचा खेळ मंदावला असल्याचे निर्दशनाच आले. त्यामुळेच तो टीकेचा धनी धरला. Mumbai Indians च्या हरण्यामागे हार्दिक पांड्या ठरला कारण, जाणून घ्या का

सध्या IPL च्या मॅचेस सुरु आहेत. काल 27 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायर्झची मॅच होती. ही मॅच सुरु झाली त्यावेळी मुंबई इंडियन्स जिंकेल असे अनेकांना वाटत होते. पण गोलंदाजीमध्येही मुंबई संघाने तसा मारच खाल्ला. त्यानंतर फलदांजीत तरी काहीतरी चमत्कार होईल असे वाटत होते. परंतु पाचव्या क्रमांकावर आलेला हार्दिक काही फटके मारल्यानंतर जो शांत झाला. त्यानंतर त्याने तसा काही खेळच दाखवला नाही. उलट तो बॉल चुकवत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. तो आऊट झाल्यानंतर मॅच हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण मॅच जिंकण्याची चिन्हं काहीही दिसत नव्हती. फलंदाजी उत्तम करणारा हार्दिक ही मॅच मुद्दाम हातातून घालवत असल्याचे सगळ्यांना दिसले.
यंदा Mumbai Indians संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आहे. पण त्याने घेतलेले अनेक निर्णय हे संघासाठी उत्तम नसल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे. त्याचकारणामुळे तो सध्या सगळ्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.