mobile chargingmobile charging

Mobile Charging | हल्ली आपल्या सगळ्यांकडेच महागातले फोन असतात. इतर कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणांपेक्षा मोबाईलचा वापर हा सगळ्यात जास्त केला जातो. फोन नवा घ्यायला गेलो तर चांगल्यातला चांगला फोन हा 20 हजार रुपयांपासून सुरु होतो ते अगदी 2 लाखांपर्यंत महागडे असे फोन मिळतात. आता इतका पैसा घातल्यानंतर या फोनची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. साधा मोबाईल चार्ज करायचा असेल तरी तो कसा करायला हवा हे आपल्याला माहीत असायला हवे. Mobile Charging ला लावताना आपण काय चुका करतो ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Hair Wash Tips | 5 +आठवडयातून कितीवेळा धुवावेत केस

Mobile Charging ला लावताना तुम्ही तर करत नाही ना चुका

काही जणांना फोन सतत चार्ज करण्याची किंवा अपडेट करण्याची सवय असते. त्यांच्यासाठीच हा लेख फार महत्वाचा असणार आहे. तुम्ही नेमक्या कोणत्या चुका करता त्या कशा टाळायच्या त्यासाठी ही माहिती.

  1. फोन सतत चार्ज करणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. काही जण बॅटरी अगदी जराही खाली उतरु देत नाही. जरा फोन ड्रेन झाला असे वाटले की, ते फोन चार्जिंगला लावतात. त्यामुळे फोनचा वापर न करता तो सतत चार्ज करत असाल तर त्यामुळे बॅटरी लाईफ कमी होऊ लागते. शिवाय फोनची बॅटरीही कमी होऊ लागते.
  2. फोन चार्जिंगला रात्रभर ठेवणे हे देखील चुकीचे आहे. सकाळी उठून ऑफिसला जायचे आहे म्हणून जर तुम्ही फोन चार्ज करायला रात्रभऱ लावत असाल तर अशामुळेही फोन लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे फोन तापणे किंवा त्याचे लाईफ कमी होते. कालांतराने तो कामही कमी करु लागतो.
  3. खूप जणांना फोनसोबत दिलेला चार्जर घेऊन जाण्याचा कंटाळा असतो. बाहेर कोणाकडेही चार्जर मिळेल या हिशेबाने जो कोणता चार्जर आपल्या फोनला होईल असा विचार करुन अनेक जण कोणताही चार्जर वापरतात. जलदगतीने चार्ज करणारेही चार्जर असतात. पण ते तुमच्या फोनसाठी योग्य आहेत की नाही याचा देखील अनेक जण विचार करत नाहीत. त्यामुळे होते असे की, तुमचा फोन लवकर खराब होते.
  4. फोन चार्ज करताना चार्जिंग पॉईँट हे सेफ असायला हवेत. जर असे नसेल तर तुमचा फोन खराब होऊ शकतो. अनेक जण कुठेही फोन चार्जिंगला लावतात अशा ठिकाणी स्फोट होऊन अपघातदेखील झाले आहेत. त्यामुळे फोन चार्जिंगला लावताना ही काळजी घ्यायला हवी.

तुम्हीही फोन चार्जिंग Mobile Charging ला लावताना या चुका करत असाल तर त्या टाळायला हव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *