राज्यभरात सध्या धनगर आरक्षणाने चांगलाच जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे खास पत्रव्यवहार करुन धनगर आरक्षणासाठी काही खास मागणी केली होती. पण आता त्यांनी केलेल्या एका नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये मी सगळ्यात आधी एक धनगर आहे आणि मग भाजपचा आमदार….या शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळेही ते चर्चेत आहेत. यासगळ्यामुळेच त्यांच्या राजीनामाच्याची चर्चा ही आता जोर धरु लागली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय? घेऊयात जाणून
अजित पवारांना म्हणाले ‘कोल्हा’
धनगर आरक्षणासंदर्भात आमदार गोपीचंद पडाळकर हे कायमच फ्रंटफूटवर दिसतात. त्यांच्याकडे असलेल्या पदापेक्षाही ते आधी धनगर समाजाचे आहेत असे सांगतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रव्यवहार करुन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खास मागण्यांसाठी एक बैठक बोलावण्याची विनंती केली होती. पण या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता. यासंदर्भात त्यांना ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी अजित पवारांचा उल्लेख कोल्हा असा केला. त्याचा परिणाम पुण्यातील मावळ येथे त्यांच्याविरोधात आक्रमक झालेले दिसले. अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्यांनी पडाळकरांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महायुतीतच हा एक नवा वाद होताना दिसला आहे.
इतकेच नाही तर आमदार पडाळकर हे अनेकदा शरद पवारांना टार्गेट करताना दिसतात.पवार कुटुंब हे नेहमी आपल्या फायद्याचे निर्णय घेते. त्यांना जनतेची पडलेली नाही असेही ते या आधी म्हणाले आहेत. पडाळकर गेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात उभे होते. यात पडाळकर हरले . पण त्यामुळे त्यांच्यातील वाद हा काही नवा नाही हे दिसून येते.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पडाळकर यांची बाजू घेतलेली नाही. कारण सध्या राज्यात BJP + NCP + Shiv Sena यांचे सरकार आहे. अशावेळी सगळ्यांनी एकमेकांचा आदर ठेवणे हे अतिशय गरजेचे आहे. अजित पवारांबद्दल असे विधान पडाळकरांनी करणे हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.