भाजपा आमदार गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ते ‘धनगर जागर यात्रे’च्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. दरम्यान, ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी एसटीडी अर्थात साहेब, ताई आणि दादा उल्लेख करत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना लक्ष्य केलं आहे. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य – सुधीर मुनगंटीवार
यावेळी उपस्थित लोकांना उद्देशून गोपीचंद पडळकर म्हणाले, “तुम्हाला कितीही गुलामगिरीची जाणीव करून दिली, तरी तुम्ही बंड का करत नाही? तुम्ही पेटून का उठत नाही? तुम्हाला राग का येत नाही? तुमच्या तळपायाची आग मस्तकात का जात नाही? तुम्ही आणखी किती दिवस STD च्या नादी लागणार? एसटीडी म्हणजे काय? एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा. एसटीडीच्या गुलामगिरीतून तुम्ही बाहेर पडा. एक दिवस तुम्ही राजा व्हाल. हे साहेब, ताई, दादा म्हणणं सोडून द्या. इंग्रजांच्या काळात गुलामगिरीसाठी जी रचना केली होती, तशीच ही एसटीडीची रचना आहे.”
महाराष्ट्रातील चळवळी संपवण्याचं महापाप शरद पवारांनी केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपाई पक्ष फोडला. यशवंत सेना संपवली. धनगरांना धनगरी ताकदीची जाणीव व्हावी, समाजानं एकत्र यावं हाच धनगर जागर यात्रेचा उद्देश आहे. ही भावना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील विझोरी येथे व्यक्त केली.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्रातील लांडगा कोण आहे? हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. तर कोण लांडगा या महाराष्ट्रात भांडण लावतो? कोणी रिपब्लिकन पार्टीचे तुकडे तुकडे केले? धनगराला एसटीऐवजी एनटीचा दाखला कोणी दिला? हे खाली बसलेले मेंडके ही सांगतील अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. धनगर आरक्षणासाठी काढलेली धनगर जागर यात्रेच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे पहिली जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.