महापालिकेचा मलबार हिल येथील तब्बल 1200 स्क्वेअर फुटाचा बंगला राज्य सरकारच्या स्टेट थिंक टँकला देण्यात आला आहे. पण त्यासाठी ही जागाही कमी पडत असल्याची माहिती MITRA चे सीइओ प्रवीण परदेशी यांना दिली आहे. त्यामुळे राज्यसरकार आता नरिमन पाँईट येथील उच्चभ्रू परिसरात तब्बल 8 हजार स्क्वेअर फुटाची जागा भाडे तत्वावर घेणार आहे. ज्याचे भाडे महिन्याला 21 लाख इतके असणार आहे. म्हणजेच याचा वार्षिक खर्च हा 2.5 कोटीच्या घरात जाणार आहे.
सरकारकडून या योजनेसाठी 1200 स्क्वेअर फुटाची जागा राज्य सरकारच्या नवीन जागेत देण्यात आली होती. पण ही जागा कमी पडत असून याहून मोठी जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. पण त्यावेळी ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. याप्रकल्पासाठी जागा कमी पडत असल्याने यासाठी नरिमन पाँईट परिसरातील असून ही जागा 7,500 स्क्वेअर फूट आहे. त्यामुळे याचे काम करणे अधिक सोपे जाणार आहे.
2022 साली स्टेट थिंक टँगला सुरुवात झाली आहे. नीति आयोगांतर्गत येणाऱ्या या प्रकल्पाद्वारे वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या क्षेत्राचा अभ्यास करुन त्यासंदर्भात देशाला आर्थिक फायदा कसा होईल याकडे त्याचे अधिक लक्ष असते. देशभरात वेगवेगळ्या थिंक टँक या सध्या कार्यरत आहेत. पण यासाठी होणारा खर्च हा देखील तितकाच आहे.