मंगलप्रभात लोढा करणार मुंबई खड्डे मुक्तमंगलप्रभात लोढा करणार मुंबई खड्डे मुक्त

पावसाळा आला की, मुंबईचे खड्डे हा एकच विषय चर्चेचा बनतो. कितीही प्रयत्न केले तरी मुंबईची चाळण होणे काही थांबत नाही. या खड्डयांचा प्रश्न मार्गी कधी मार्गी लागेल असा विचार पडतो. महापालिकेची नेहमीची आश्वासने ही फोल ठरतात. पण आता मुंबई महापालिकेच्या नाकावर टिच्चून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा ( MangalPrabhat Lodha) यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल अशी आशा आहे.

मुंबईतील खड्ड्यांसदर्भात मंगलप्रभात लोढा यांनी चांगला निर्णय घेतला असून अनेक ठिकाणी कामांना सुरुवात केली आहे. मुंबई उपनगरमधील के पश्चिम वॉर्ड, के पूर्व वॉर्ड व एल वॉर्ड येथील इर्ला मार्ग जंक्शन, व्ही. एम. मार्ग आणि एस. व्ही. मार्ग जंक्शन,सहार मार्ग जंक्शन, साकीनाका जंक्शन, कांजूरगाव इत्यादी ठिकाणी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रस्त्यांची पाहणी केली.मुंबईतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले असून याची पाहणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा(Mangalprabhat Lodha) यांनी केली. भविष्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांबाबत नागरिकांसाठी एक व्हाट्स ॲप तक्रार क्रमांक आणि ॲपद्वारे तक्रार प्राप्त झाल्यावर २४ तासात खड्डे बुजविले जावेत असेही आदेश दिले आहेत. प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून मुंबईतील खड्डे एका आठवड्यात बुजविले जातील असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

दोन वर्षांच्या आत काँक्रिटीकरण

मुंबईमध्ये गेले १० दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे विविध रस्त्यांवर खड्डे तयार झालेले आहेत. हे खड्डे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासकीय दिल्या.

मुंबई महापालिकेत मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे एक स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक काम करण्यास सुरु केली आहेत. याला आदित्य ठाकरे यांनी विरोध केला होता. कारण पहिल्यांदाच महापालिकेच्या मुख्यालयात अशाप्रकारे पालकमंत्र्याचे कार्यालय सुरु करण्यात आले. हुकुमशाही पद्धतीने ही घुसखोरी केल्याचे देखील आरोप करण्यात आले. पण सध्या महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत हे कार्यालय असणार आहे असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *