Loksabha 2024मध्ये आता अधिक घौडदोड सुरु असताना दिसत आहे. अजूनही काही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे अजूनही अनेक ठिकाणी तणाव कायम आहे. त्यातच काही ठिकाणी उमेदवार जाहीर करुन मग बदलणे असेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेत मात्र उमेदवारावर निर्णय होताना दिसत नाही. हिंगोली, यवतमाळमध्ये अनेकांच्या तोंडी घास येता येता राहिला आणि अपेक्षित नव्हते त्यांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. हे पाहता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे. या आधी कधीही घडले नाही ते आता घडत आहे. बाळासाहेब ठाकरे असताना भाजपची अशी उमेदवारी बदलण्याची हिंमत झाली नसती असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर चिंता व्यक्त केली आहे.
महायुतीत शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी काही ठिकाणी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. परंतु ही नावे बदलण्यात आली आहेत. भाजपाकडून शिंदे गटाचे उमेदवार बदलणयात आलेले पाहता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणवून घेणाऱ्या शिंदे गटाचा खरा चालक कोण? हेच कळेनासे झाले आहे असे देखील ते म्हणाले. इतकेच नाही तर शिंदे गटाची शिवसेना ही केवळ काही महिन्यांचीच आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील नाही असे वाटते.
शिवसेनेत गळचेपी नाही
अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. त्याबद्दल ते म्हणाले की, आमच्या शिवसेनेत आम्हाला ऐकले जाते. आम्हाला आमची मतं देण्याचा अधिकार आहे. या पक्षात लोकशाही चालते. त्यामुळे आमची कोणतीही गळचेपी या पक्षात होत नाही.
सध्याची परिस्थिती पाहता हा पक्ष केवळ काही महिन्यापुरता खरंच राहतो की, टिकून राहतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.