Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी काही समीकरणं देखील बदलताना दिसत आहे. असे असताना आता एका विधानाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी उबाठा गटाच्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर काही आरोप आहेत. इतकेच काय तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील ठाकरेंवर टीका केली आहे. त्यावर संजय राऊत (sanjay Raut) यांनी देखील पलटवार केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, उबाठा गटाच्या शाखाप्रमुखावर एक महिलेचा छळ केल्याचा आरोप आहे. अशा व्यक्तीला जाऊन आदित्य ठाकरे भेटतात. याचा अर्थ त्यांचे याला समर्थन आहे. उबाठा गटाच्या शाखाप्रमुखावर मालमत्तेसाठी लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर छळ करण्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात एफआयआरही दाखल आहे. ही व्यक्ती नुकतीच जामिनावर बाहेर आली असून तिला जाऊन आदित्य ठाकरे यांचे भेटणे म्हणजे अशा अत्याचाराला समर्थन दिल्यासारखे आहे.
Loksabha 2024 | शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल काय म्हणाले अंबादास दानवे, वाचा बातमी
कोरोना काळात पैशांचा गैरवापर Loksabha Election 2024
कोरोना काळात महापालिकेकडू जनतेला देण्यात आलेल्या पैशांचाही गैरवापर बाप- बेट्यांनी केला आहे. त्यासाठी ते लवकरच तुरुंगात जातील अशी टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव- आदित्य यांचे नाव न घेता केला आहे. पुढे ते म्हणाले की, राणे यंत्रणाही कार्यरत असते. सीआयडी, ईडी वेगळे आहेत, माझी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. अनेक जण कुठे जातात, कुठे फुटतात, कुठे उतरतात, फार बारकाईने माहिती असते, असे नारायण राणे म्हणाले होते.
संजय राऊतांचा पलटवार
त्यावर संजय राऊत यांनी पलटवार करत म्हटले की, दोन महिन्यांनी देशात आमची सत्ता येणार आहे. त्यामुळे दोन महिन्यांनी ते कुठे असतील, ईडी आणि सीबीआयच्या त्यांच्या ज्या फाइल्स बंद केल्या आहेत, त्या पुन्हा उघडल्या तर ते कुठे असतील, ते तिहार जेलमध्ये जातील
एकूणच आरोप-प्रत्यारोपामुळे एकूणच वातावरण गरम झाले आहे.