लक्षद्वीप प्लॅनिंगलक्षद्वीप प्लॅनिंग

Lakshadweep Tour या बद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. यंदा 2024 मध्ये अनेकांनी वेगवेगळ्या आणि न पाहिलेल्या ठिकाणांना भेट द्यायचे नक्कीच ठरवले असेल. जर तुम्हाला भारतातील असा स्वर्ग पाहण्याची इच्छा असेल तर आजचा लेख हा तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण काश्मीरबद्दल नाही तर असा एका बेटाबद्दल बोलत आहोत जेथे जाणे स्वर्गात जाण्यासारखे आहे. आम्ही बोलत आहोत लक्षद्वीप बद्दल. कुठेतरी वेगळीकडे जाण्याचा विचार असेल तर तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट द्यायला हवी. लक्षद्वीपचा इतिहास, तेथील वैशिष्ट्य आणि तेथे कसे जावे याचे प्लॅनिंग आज आपण जाणून घेऊया.

Ujjain Mahakaleshwar | वाचा उज्जैन महाकालेश्वरची कथा, अशी प्लॅन करा टूर 2024

Govardhan Eco Village | महाराष्ट्रातील या ‘वृदांवन’ला नक्की द्या भेट

लक्षद्वीप बेटाची माहिती

भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यापैकी सगळ्यात लहान बेट म्हणजे लक्षद्वीप होय. लहान लहान बेटांचा यावर समावेश आहे. येथील लोकसंख्या ही लाखाच्या आत आहे. परंतु येथील साक्षरतेचे प्रमाण हे केरळ नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. करवत्ती ही या द्वीपची राजधानी असून येथेे विविध पिके घेतली जाते. येथील बेटावर इस्लाम धर्माची सत्ता असली तरी इतिहासातील काही दाखल्यानुसार येथे हिंदू- मुस्लिम अशा दोन्ही परंपरा आजही पाळल्या जातात. भारताच्या पश्चिम किनारा, अर्थात अरबीसमुद्राच्या आत हे बेट आहे. परंतु समुद्रसपाटीपासून हे बेट तसे उंचावर नाही.

या बेटाची माहिती घेताना असे कळते की, या बेटाचा शेवटचा राजा चेरमान पेरुमल हा राजा त्याने येथे शेवटची वसाहत वसवली होती. त्याला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडले. मक्केला जाऊन येतो असे सांगून त्याने आपला प्रवास सुरु केला. त्याला शोधण्यासाठी म्हणून खलाशांच्या बोटी पाठवण्यात आल्या. परंतु दुर्देवाने त्यात असलेल्या कननोरच्या राजाची बोट ही वादळात फुटली आणि अरबी समुद्रात बुडाली. त्या बोटीत असलेले काही लोक आसपासच्या बेटाजवळ जाऊन वसले. तेथे नव्याने वस्ती वसवण्यात आली. त्यानंतर राजाच्या मार्गदर्शनाखाली येथील अमिनी बेटाचा शोध लावला. त्यानंतर येथेही वस्ती झाली. त्यामुळे येथे हिंदू- मुस्लिम अशी दोन्ही वस्ती पाहायला मिळते.

पूर्वी भारतातून थेट लक्षद्वीपला जाणे शक्य नव्हते. कडक अशा नियमांमुळे जाता येणे कठीण होते. परंतु आता थोडे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे भारतातून आता येथे जाणे तसे शक्य आहे.

असे करा लक्षद्वीपचे प्लॅनिंग

लक्षद्वीप फिरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

आतालक्षद्वीप हे बेट असल्यामुळे तेथील वातावरण हे समुद्रामुळे गरम असणे आलेच. येथे उन्हाळ्यात प्रचंड उष्मा सहन करावा लागतो. तर पावसात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथे जाण्यासाठी थंडीचा काळ हा योग्य आहे. जर तुम्हाला उष्मा सहन होत असेल तर तुम्ही या काळातही टूर प्लॅन करु शकता.

  1. लक्षद्वीपला जाण्यासाठी तुम्हाला कोच्चीचे तिकीट बुक करावे लागेल. कोच्चीच्या अगत्ती एअरपोर्टपासून तुम्हाला पुढचा प्रवास करता येईल.
  2. या एअरपोर्टवरुन तुम्हाला बोट अथवा डायरेक्ट फ्लाईट घेऊन लक्षद्वीपला जाता येते. (बुकिंग करताना तुम्ही येथील वातावरणाचा अभ्यास नक्की करा.)
  3. येथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हॉटेल बुकिंग करता येईल. लोकल्स या बाबतीत तुम्हाला चांगलीच मदत करु शकतील.
  4. येथील ठिकाण फिरण्यासाठी आणि समुद्राचा आनंद घेण्यासाठी 4 ते 5 दिवसांची टूर ही पुरेशी आहे. याचा खर्च हा साधारणपणे तुम्हाला 25 ते 30 हजार इतका होऊ शकतो.
  5. परंतु येथील कोणती ठिकाणे पाहायची असा विचार करत असाल तर येथे तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी, येथील कल्चर अनुभवण्यासाठी, शांततेचा अनुभव घेण्यासाठी नक्कीच जा.

चलो लक्षद्वीप

आतापर्यंत अनेकांनी मालदिव्जला जाण्याची स्वप्न पाहिली असतील. मालदिव्जचे फोटो पाहिल्यानंतर एकदा तरी मी इथे जाईन असा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण मालदिव्जला आताच्या काळात इतकी प्रसिद्धी मिळाली की, त्यामुळे येथे जाण्याचा खर्च आता काही सर्वसामान्यांना परवडणारा नाही. मालदिव्जच्या तुलनेत सुंदर आणि आपल्या देशात असलेला लक्षद्वीप हा भाग आपण भारतीय असून पूर्णपणे विसरुन गेलो आहोत. हे ठिकाणही तितकेच सुंदर आणि टुरिस्टचे आकर्षण आहे. पण त्याबद्दल फारसे बोलले जात नाही. त्यामुळे आता आपल्या देशातील या ठिकाणााला ग्लोबल पातळीवर प्रसिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे. आपल्या देशातील हे ठिकाण मालदिव्जमुळे मागे पडले खरे! पण आता पुन्हा एकदा ते वर येेईल असे दिसत आहे. त्यामुळे यासाठी वेळीच प्लॅन करा.

मग कधी करताय लक्षद्विपचे प्लॅनिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *