जुन्या आयफोनला मिळणार इतकी किंमतजुन्या आयफोनला मिळणार इतकी किंमत

iphone वापरणं हा आजही एक स्टेटस सिंबल आहे. खूप जण ॲपल कंपनीने बनवलेले इलेक्ट्रॉनिक्स वापरतात. कारण ते हाताळणे आणि त्यावर काम करणे हे अधिक सोयीचे असते. दुसरीकडे त्यामुळे समाजात एक वेगळी वट तयार होते हे आलेच. बाजारात ॲपलने नवा फोन किंवा काहीही आणले की ते घेण्यासाठी दुकानांबाहेर रांग लागते. पण आता ज्यांच्याकडे जुने आयफोन असतील त्यांना मालामाल होण्याची संधी मिळणार आहे. जुन्या आयफोनच्या किंमती या कोट्यवधीच्या घरात असून सध्या एक दुर्मिळ असा आयफोन शोधला जात आहे.

Iphone या मॉडेलला चिक्कार मागणी

2007 साली ॲपलने लाँच केेलेला 4GB क्षमता असलेला हा फोन सध्या शोधला जात आहे. ज्यांच्याकडे तो असेल त्यांनी या लिलावात सहभागी होण्याची विनंतीही करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नुकताच हा फोन तब्बल 1 कोटी 57 लाखाच्या बोलीवर विकला गेला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हा फोन असेल त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. 10 हजार युएस डॉलरवर याची बोली सुरु झाली होती. ती कोट्यवधीच्या घरात पोहोचली.

अत्यंत दुर्मिळ असा फोन

ॲपने बनवलेला 4 GB चा हा फोन अत्यंत दुर्मिळ आहे. कंपनीने याचे काही ठराविक पीसच बनवले होते. कारण त्यानंतर लगेचच 8 GB चे फोन तयार करण्यात आले. त्यामुळे ज्याच्याकडे हा फोन आहे त्याला तो विकून अधिकचे पैसे कमावण्याचा लाभ मिळेल .

मग तुमच्याकडेही असेल जुना आयफोन तर तो ठेवा जपून भविष्यात होईल फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *