T20 World Cup Indian Team

अखेर प्रतीक्षा संपली असून T-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे, तर IPL मध्ये फॉर्मसाठी झगडत असलेला हार्दिक पंड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर KL राहुलला संघाबाहेर ठेवण्यात आले असून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. 

सलामी करणार जयस्वाल

jaiswal

रोहित शर्मासह सलामीची जोडी यशस्वी जयस्वाल असेल, तर सध्याच्या अहवालानुसार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर दिसणार आहे. हार्दिक पांड्याला संघात स्थान देऊ नये, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. निवड समितीने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला संघात स्थान दिले आहे. 

(वाचा – RR Vs MI: IPL 2024 मध्ये यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, सातव्या विजयासह मुंबई इंडियन्सला हरवले)

शुभमन गिल राखीव खेळाडू

दुसरीकडे, शुभमन गिल आणि केएल राहुलसारख्या मोठ्या नावांचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. जर आपण संघाकडे पाहिले तर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्याशिवाय संजू सॅमसन, विराट कोहली हे दोन खेळाडू ओपनिंग करू शकतात. 

(वाचा – RCB Vs KKR | Live मॅचमध्ये विराट कोहलीचा रूद्रावतार व्हिडीओ व्हायरल, BCCI कडून होऊ शकते शिक्षा)

शिवम दुबेला संंधी 

हार्दिक पांड्याशिवाय अष्टपैलू म्हणून शिवम दुबेला संघात स्थान देण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने IPL 2024 मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे, तर फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा आहेत. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाज म्हणून दिसणार आहेत. मोहम्मद शमीला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाच्या निवड समितीकडे फारसा पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र, आवेश खान आणि खलील अहमद यांचे नाव राखीव खेळाडूंच्या यादीत नक्कीच आहे. 

(वाचा – CSK Vs LSG | लखनऊने रोखला CSK चा विजयरथ, के एल राहुलची धमाकेदार खेळी)

महत्त्वाचे सामने 

भारत 05 जून 2024 रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयर्लंडविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल, त्यानंतर 09 जून 2024 रोजी त्याच ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचा सामना होईल. यानंतर 12 आणि 15 जून रोजी भारताचा सामना अमेरिका आणि कॅनडाशी होणार आहे.

T-20 विश्वचषक-20 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार)

हार्दिक पंड्या (उपकर्णधार)

यशस्वी जयस्वाल

विराट कोहली

सूर्यकुमार यादव

ऋषभ पंत (यष्टीरक्षक)

संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

शिवम दुबे

रवींद्र जडेजा

अक्षर पटेल

कुलदीप यादव

युझवेंद्र चहल

अर्शदीप सिंग

जसप्रीत बुमराह

मोहम्मद सिराज

T20 विश्वचषक-20 साठी भारताचे राखीव खेळाडू

शुभमन गिल

रिंकू सिंग

खलील अहमद

आवेश खान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *