relationship-tips

प्रेम व्यक्त करणे नेहमीच सोपे नसते. कधीकधी “आय लव्ह यू” म्हणायला अनेकांना संकोच वाटतो. विशेषत: पुरुष काही काळानंतर त्यांच्या पार्टनरला I Love You म्हणणे बंद करतात. त्यांना वाटते की प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी फक्त एकत्र असणे पुरेसे आहे. परंतु महिलांना मात्र आपला जोडीदार आजही तितकाच प्रेम करतोय हे जाणून घेण्यासाठी त्याच्या तोंडून आय लव्ह यू नियमित ऐकणे आवडते. 

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आय लव्ह यू न म्हणता तुमच्या पार्टनरला नेहमी स्पेशल फील करून द्यायचे असेल आणि तुमचे नाते घट्ट करायचे असेल, तर ही पद्धत तुमच्यासाठी आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करू शकता. (फोटो सौजन्य – iStock) 

स्पेशल डिश बनवा 

रोज तासनतास स्वयंपाकघरात उभं राहून प्रत्येकासाठी अन्न शिजवणाऱ्या आपल्या स्पेशल व्यक्तीसाठी तिचा जोडीदार जेव्हा तिच्या आवडीचं जेवण बनवतो आणि तिला प्रेमाने खायला घालतो अथवा भरवतो तेव्हा तिचं हृदय मेणासारखं वितळू लागतं. 

हे तिच्यासाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा तुमची लेडी लव्ह घरी नसेल, तेव्हा तिच्यासाठी एक खास डिश तयार करा आणि तिला सरप्राईज द्या. 

(वाचा – Marriage Tips | Vidya Balan ने लग्न सांगितला लग्नानंतर नातं मजबूत करण्याचा फॉर्म्युला, नव्या जोडप्यांसाठी गुरूमंत्र)

क्वालिटी टाइम एकत्र घालवणे 

आजच्या व्यस्त जीवनात जोडीदार एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. पण नात्यात प्रेम टिकवण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाइम अर्थात दर्जात्मक वेळ घालवला पाहिजे. त्यांच्यासोबत त्यांचा आवडता चित्रपट पहा, त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जा किंवा एकत्र त्यांच्या आवडते गेम्स खेळा, हवे तर रोमँंटिक गेम्स खेळा. 

(वाचा – Gaslighting | गॅसलायटिंग काय आहे? नात्यावर कसा होतो परिणाम, स्वतःला कसे ठेवाल दूर)

प्रशंसा करा 

स्तुती केली की प्रत्येकाला ते आवडते. तुमच्या जोडीदाराच्या गुणांची प्रशंसा केल्याने त्यांना चांगले वाटेलच पण तुम्हाला ते किती आवडत आहेत याची त्यांना जाणीव होईल. अशा परिस्थितीत त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करा, त्यांनी घातलेल्या ड्रेसची किंवा ते कसे दिसत आहेत याची प्रशंसा करा किंवा त्यांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा.

(वाचा – Divorce Reason | ५ कारणाने होतोय सर्वात जास्त घटस्फोट, तिसरे कारण वाचाल तर व्हाल हैराण)

लहानसहान गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आय लव्ह यू म्हणत नसाल तर तिच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेत असाल तर तिच्यासाठी यापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही. सोबत राहत असलो तरी रोज त्यांना फोन करून जेवलास का? विचारत जा किंवा घरी आल्यावर दिवस कसा गेला विचारा. त्यांच्यासोबत राहा. मोबाईलवर राहू नका, एवढ्यावरच त्याच्या सगळ्या तक्रारी संपतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *