hair wash tipshair wash tips

Hair Wash Tips | केस हा अनेकांसाठी खूपच महत्वाचा विषय आहे. केस हे कोणत्याही माणसासाठी सौंदर्य आहे अशी एक व्याख्या आपल्याकडे प्रचलित असल्यामुळे केसांच्या बाबतीत आपण थोडे जास्तच आग्रही असतो. केसांची काळजी घेणाऱ्या सगळ्या टिप्स म्हणूनच आपण तंतोतंत फॉलो करतो. केसांच्या वाढीचा आणि त्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याचा संबंध हा वरच्या वरच्या काळजीसोबत तुम्ही काय खाता यावरही अवलंबून असतो. केस चांगले ठेवणे हे काही चांगल्या काळजीमध्येही अवलंबून असते. तुम्ही केस कसे धुता? कितीवेळा धुता? हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. आज आपण केसांच्या Hair Wash Tips जाणून घेणार आहोत.

Worst Gift Ideas | हे 10 गिफ्टस चुकूनही कोणालाही देऊ नका

केस धुण्यासाठी टिप्स Hair Wash Tips

केस धुणे हा खूप जणांसाठी एक टास्क असतो. काही जणांचे केस इतके मोठे आणि दाट असतात की केस धुवायचे म्हटले की, त्यांना त्या साठी खास वेळ काढावा लागतो. तुमचे केस मोठे असो किंवा लहान केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स या तुम्ही अगदी हमखास पाळायला हव्यात.

  1. जर तुमचे केस कोरड्या या प्रकारातील असतील. म्हणजे तुमच्या केसांना फाटे फुटत असतील तर अशावेळी तुम्ही सतत केस धुणे चांगले नाही. कारण अशामुळे तुमचे केस सतत कोरडे पडून तुमच्या केसांना फाटे फुटू शकतात. तुमचे केस रुक्ष दिसू लागतील. अशांनी केसांची स्वच्छता करण्यासाठी आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा केस धुवावेत. Hair Wash Tips
  2. जर तुम्ही केसांना ट्रिटमेंट घेतली असेल जसे की, केसांना रंग केला असेल तर अशावेळी तुम्हाला काही खास शॅम्पू दिले जातात ते देखील तुमचे केस कोरडे करतात. अशावेळी तुम्ही कमीत कमी प्रोडक्ट आणि कमीत कमी वेळा केस धुवायला हवेत.
  3. खूप जणांचे केस खूपच तेलकट प्रकारातील असतात. तर अशांचे केस अगदी दोनच दिवसात चिकट होऊ लागतात. त्यांच्या स्काल्पवर कोंडा येऊ लागतो. अशांनी योग्य सल्ला घेऊन मगच केस धुवायला हवेत. तुम्ही आठवड्यातून किमान 3 वेळा केस धुवायला हवेत.
  4. ज्यांचे केस सतत गळत असतील अशांनी केस धुताना विशेष काळजी घ्यायला हवी. शॅम्पूच्या निवडीबाबत त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारण तुम्हाला कदाचित कोणतेही शॅम्पू चालणार नाही. त्यामुळे तुमचे केस गळण्याची शक्यता अधिक असते.
  5. केसांना खूप रगडून रगडून धुणेही केसांसाठी चांगले नाही. खूप जण स्काल्प ही खूपच रगडून घासतात त्यामुळे केसांचे खूप जास्त नुकसान होऊ शकते.

आता केस धुताना या काही गोष्टी नक्की लक्षात घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *