गोपीचंद पडाळकरगोपीचंद पडाळकर

मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणानेही जोर धरला आहे. धनगर समाजाने आरक्षणासाठी सातारा येथील कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला. त्याचा व्हिडिओ सध्या सगळीकडेच वायरल होताना दिसत आहे. यावर आमदार गोपीचंद पडाळकरांनी आपल्या शब्दाने आंदोलक तरुणांना फटकारत विखे पाटलांना दिलासा दिला आहे.

सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. शेखर बंगाळे असे या धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेखर बंगाळे यांच्याकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर विखे-पाटील हे निवेदन वाचत असताना शेखर बंगाळे याने खिशातून भंडाऱ्याने भरलेला रुमाल काढला आणि तो सरळ विखे-पाटलांच्या डोक्यावर रिकामा केला. यावेळी त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’च्या घोषणा दिल्या. यावेळी विखे-पाटलांच्या डोक्यावर सर्वत्र भंडारा पसरला होता.

उधळलेला भंडारा खंडोबाचा आशीर्वाद

मल्हारी मार्तडाचा ‘भंडारा हा समस्त बहुजन सामाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतिक आहे.त्याचा आंदोलनासाठी वापर करणे हे अतिशय अयोग्य आहे.आणि जर काही लोकांनी तो विखे पाटलांवर उधळला असेल तर मी विखेंना विनंती करतो की तो खंडोबाचा आशिर्वाद समजून कपाळाला लावा.तसेच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना अवाहन करतो की या लांडगा काकाच्या नादाला लागू नका.आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या मुंबई उच्च न्यायालायात लढतो आहोत.आणि त्याबाबात वेळोवेळी जे मागितले ते सर्व सहकार्य मा. देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आपल्याला मिळत आहे आणिआम्हाला खात्री आहे की मल्हारी मार्तंड खंडोबा नक्कीच आपल्याला यश देईल, असे आमदार पडाळकर म्हणाले आहेत

दरम्यान वेगवेगळ्या स्तरातून या झालेल्या घटनेची निंदा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *