9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. हिंदू नववर्षाची सुरुवातही चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. नवरात्रीचे 9 दिवस माता दुर्गाला समर्पित करण्यात येतात. या दिवशी भक्त मातेला प्रसन्न करून आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात. चैत्र नवरात्री ही बऱ्याच ठिकाणी साजरी केली जाते.
या ९ दिवसात उपवासाचे काही नियम आहेत आणि त्याचे पालन केल्यास भक्तांना आशिर्वाद मिळतो असे समजले जाते. व्रत खंडित होऊ नये यासाठी भक्तांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कशा पद्धतीने हे व्रत करावे आणि काय खावे वा खाऊ नये जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
नवरात्रीत काय खावे? (What To Eat During Navratri)

- नवरात्रीचे ९ दिवस सात्विक आहार खावा असं सांगण्यात येते. यामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर खाऊ शकता
- नवरात्रीचे व्रत करताना साबुदाणा पिठाचे थालिपीठ, रताळ्याच्या पिठाचे थालिपीठ, शिंगाड्याच्या पिठाचे थालिपीठ खावे
- याशिवाय ९ दिवस शरीरात थंडावा राहावा यासाठी दही, दूध, तूप, ताक याचेही सेवन करावे
- चहा-कॉफी पिऊ शकता. तसंच तुम्ही कोणत्याही पद्धतीचे सरबत, नारळ पाणी, ज्युस याचे सेवन करू शकता
- ताजी फळं नियमित खावीत जेणेकरून तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहील
नवरात्रीत काय खाऊ नये? (What To Avoid During Navratri Fasting)

- नवरात्रीचे उपवास करताना तुम्ही गहू, तांदूळ अथवा कोणतेही धान्य खाण्याचे टाळावे
- कांदा, लसूण यासारखे तामसिक पदार्थ खाण्यापासून दूर राहावे कारण हे मेंदूसाठी हानिकारक मानले जाते
- मांस, मच्छी, चिकन, मटण, अंडे यासारखे मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत
- ९ दिवस कोणत्याही अल्कोहोल वा सिगारेटपासून दूर राहावे
स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेतच हे ९ दिवसाचे उपवास करावेत. तुम्हाला सलग ९ दिवस उपवास झेपणार नसतील तर दिवसभर उपवास करून संध्याकाळी नेवैद्य दाखवून वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर असे रोज रात्री सेवन करून पुन्हा दिवसभर उपवास करावा. जेणेकरून तुमच्या मनालाही आनंद मिळेल.