elvish yadav ला न्यायालयीन कोठडीelvish yadav ला न्यायालयीन कोठडी

Elvish Yadav बिग बॉसचा नुसता विजेताच नाही तर त्याचा एक मोठा चाहता वर्ग त्याच्या पाठीशी आहे. नुकतेच त्याचे एका व्लॉगरसोबत काही वाद झाले होते. त्यावेळी तो वाद तिथेच थांबला खरा. पण एल्विशच्या मागून नोव्हेंबर महिन्यात केलेल्या रेव्ह पार्टीचा काही केल्या ससेमिरा काही सुटत नाही. या पार्टीमध्ये चक्क नशेसाठी सापाचे विष मागवण्यात आले होते. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकताच त्यांना येथे विष सापडले परंतु एल्विशने त्या आरोपाचे खंडन केले होते. परंतु आता त्याने तो गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नेमकं हे प्रकरण काय? चला घेऊया जाणून

Navi Mumbai | किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांकडून हत्या

वापरले होते सापाचे विष Elvish Yadav

नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील नोएडामध्ये एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत एल्विश यादव होता. या पार्टीवर काही कारणास्तव छापामारी करण्यात आली. त्यावेळी येथे सापाचे विष ड्रग्ज म्हणून वापरत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्टीसाठी एल्विशने सापाचे विष मागवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन एल्विशची चौकशीही करण्यात आली होती. पण त्यावेळी आपण पार्टीसाठी सापाचे विष मागवले नसल्याचे त्याने सांगितले. परंतु आता अचानक त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पार्टीसाठी त्यानेच सापाचे विष मागवल्याचे सांगितले आहे. त्यानुसार त्याला आता पोलिसांनी अटक केली असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

व्हिडिओ करुन नाकारले होते आरोप

एल्विशने आरोप कबूल करण्याआधी त्याच्या फॅन्सला व्हिडिओतून आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगितले होते. पण आता अचानक पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता त्याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान आता एल्विशला या सगळ्या प्रकरणानंतर किती शिक्षा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *