पुण्यातील ड्रग्ज माफीया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्यानंतर त्याचा शोध सुरु होता. अखरे त्याला चैन्नईतून पोलिसांनी अटक करुन पुण्यात आणले आहे. अम्ली पदार्थ बाळगणे आणि त्याची निर्मिती या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ललित पाटील हे नाव खूपच चर्चेत आहे. ललित पाटील या अटक करुन मुंबईत आणल्यानंतर त्याला पाहण्यासाठी प्रसारमाध्यमांची चांगलीच गर्दी झाली. ललित पाटील याने अटकेनंतर अनेक धक्कादायक अशा गोष्टींचा खुलासा केला आहे. जाणून घ्या विस्तृत बातमी
ललित पाटीलची ही केस हायप्रोफाईल अशी केस होती. त्यामुळे या केससंदर्भात अनेक गुप्तता पाळण्यात आली होती. ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाला अशी बातमी असताना आता मात्र त्याने मला रुग्णालयातून पळवण्यात आले असे सांगितले आहे. त्यामुळे आता यात कोणाकोणाची नावे समोर येणार आणि यात काही राजयकीय संबंध आहेत का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान ललित पाटीलच्या आई-वडिलांना त्याचा इन्काऊंटर होण्याची एक वेगळीच भिती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी त्याला चुकीसाठी शिक्षा द्या पण त्याचा इन्काऊंटर करु नका अशी मागणी केली आहे. त्यामुळे ललित पाटीलच्या ड्रग्ज प्रकरणात अनेक मोठ्यांची नावे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेमकं प्रकरण काय?
अम्ली पदार्थ विक्रीचा आरोप असलेला ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून 2 ऑक्टोबरला पळून गेला होता. त्याच्यावर रुग्णालयातून अम्ली पदार्थ तस्करी करण्याचा आरोप होता. तो तेथून पळून गेल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनावरही अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. ससून रुग्णालयाच्या परिसरातून तब्बल 2 कोटीचे अम्ली पदार्थ सापडले होते.