मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या औचित्य साधून या महामानवाला वंदन करण्यासाठी घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि आर. टी. ओ. वसाहत येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थितांनी जय भीम घोषणेचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. तसेच कोटेचा यांनी याप्रसंगी तथागत गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील अभिवादन केले.
माझ्या प्रचाररथाची समाजकंटकांनी नासधूस केली. आज संविधानाची निर्मीती करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.अशा दिवशी त्यांनी दिलेल्या लोकशाही मार्गाने लढाई लढण्यापेक्षा विरोधक तरूणांचे माथे भडकवून जातीयवादी रंग देण्याचे भेकड कृत्य करत आहेत. याचा मी निषेध करतो आणि आपल्या भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण संयम राखावा असे निवेदन त्यांनी यावेळी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. तर देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आल्याचे दिसून आले.
(फोटो सौजन्य – ट्विटर)