नवरात्रीच्या उपवासाला काय खावे, डाएटिशियनचा सल्लानवरात्रीच्या उपवासाला काय खावे, डाएटिशियनचा सल्ला

यावर्षी रामनवमी ६ एप्रिल रोजी साजरी केली जात आहे, त्यामुळे नवरात्रीचे उपवास ५ एप्रिलपर्यंत अनेक जण करणार आहेत. पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या आहार योजनेचे पालन कऱण्यासाठी अजूनही काही दिवसाचे उपवास शिल्लक आहेत. जर तुम्हाला या उपवासांमध्ये अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल, तर हा डाएट प्लॅन तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.

ऋजुता दिवेकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा डाएट प्लॅन शेअर केला आहे. ज्यामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत खाण्यायोग्य प्रत्येक गोष्टीचे वर्णन केले आहे. त्यात सुक्या मेवा, तृणधान्ये, फळे यांचे चांगले मिश्रण आहे आणि हायड्रेशनसाठी आवश्यक असलेले निरोगी पेये देखील उपलब्ध आहेत. या डाएट प्लॅनबद्दल जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock/Instagram) 

Constipation Home Remedies | सकाळच्या या सवयी करतील बद्धकोष्ठता दूर, आजच लावा 4 हेल्दी हॅबिट्स

सकाळी उठून काय खावे?

पोषणतज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी ३-४ भिजवलेले काळे मनुके, एक किंवा दोन केशर आणि ३-४ भिजवलेले बदाम खा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही त्यांना भिजवू शकता असा सल्ला ऋजुताने आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. तुम्ही जर उपवास करत असाल तर सर्वात पहिले दिलेल्या खाण्याचे सेवन करावे. 

जेवणात काय खावे?

नाश्ता – राजगिरा थालीपीठ किंवा दह्यासह तुम्ही थालिपीठ खाऊ शकता

सकाळी साधारण ११ वाजता एक छोटी वाटी कलिंगड वा तुमच्या आवडीचे फळ खावे 

दुपारचे जेवण – शेंगदाण्याच्या आमटीसह तुम्ही वरीचा भात खाऊ शकता

संध्याकाळचा नाश्ता – आले आणि उकडलेले आणि भाजलेले रताळे यासह तुम्ही ताकाचे सेवन करू शकता

रात्रीचे जेवण – मसाला दुधासह केळी तुम्ही खावेत. मसाला दूध बनवण्यासाठी, दुधात थोडी ड्रायफ्रूट पावडर आणि काजू, बदाम, साखर घालून उकळवा आणि ते कोमट किंवा थंड प्या

Relationship Tips | I Love You न म्हणताही स्पेशल व्यक्तीसाठी असे व्यक्त करा प्रेम, कधीच होणार नाही दूर

हायड्रेशनसाठी काय करावे?

शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी, निरोगी पेये नक्कीच प्या. पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकरच्या मते, पाण्याव्यतिरिक्त, आंबा पन्हे आणि ताज्या कलिंगडाचा रस पिऊन डिहायड्रेशन टाळता येते. तसंच दिवसातून साधारण ८ ग्लास पाणी तरी प्यायला हवेच. यामुळे तुम्हाला उपवासाचा त्रास होणार नाही. 

नवरात्रीचा सँपल डाएट प्लॅन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *