Covid Care विषयी आज आपण पुन्हा एकदा अधिक माहिती घेणार आहोत. कोरोनाच्या तीन लाटांनी आतापर्यंत अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहे. या आजाराशी दोन हात करण्यासाठी आपण सगळ्यांनी दोन लसीदेखील घेतल्या असतील. पण तरीही या आजाराचा धोका हा काही पूर्णपणे टळलेला नाही. या आजाराचे सावट अजून पूर्णपणे गेलेले नाही. एखादा आजार आल्यानंतर तो मुळासकट कधीच मिटवता येत नाही. त्यावर केवळ नियंत्रण मिळवता येते आणि त्याच्यासोबत राहण्याची आपली शारीरिक तयारी देखील होते. आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेले आहे. केरळात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहे. तब्बल 2311 इतके रुग्ण संपूर्ण देशात आहे. यांच्यावर उपचारही सुरु आहे. हा नव्या व्हेरिएंटचा कोरोना असल्याचे देखील सांगितले जात आहे. या कोरोनाशी दोन हात करताना विस्मरणात गेलेल्या कोणत्या गोष्टींनी आपण आपली काळजी घेऊ शकतो याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊयात
Covid Care कशी घ्याल
कोरोनाला हरवायचे असेल तर आपण काही गोष्टींचे पालन करायला हवे. कदाचित आपण आता त्या तितक्याशा पाळताना दिसत नाही. परंतु एक काळजी म्हणून हे करण्यास काहीच हरकत नाही.
- प्रतिकारशक्ती चांगली असेल तर ती तुम्हाला कोणत्याही आजारापासून दूर ठेवते. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती चांगली कशी राहील यासाठी काळजी घ्या. योग्यवेळी आणि योग्य असा आहार घ्या. आहारात भाज्या, कडधान्य, चिकन, अंडी, मासे यांचा योग्यपद्धतीने समावेश करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.
- व्यायाम हा इतरवेळीही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचा असतो.जर आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्हाला रोजच्या रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने दिवसातून किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करायला हवा. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुमचे शरीर बळकट आणि मजबूत मिळते.
- थंडीच्या या दिवसात कोव्हिड अधिक बळावतो कारण या दिवसात आपल्या क्रिया या मंदावलेल्या असतात. शिवाय वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला असे त्रास होतात. साधारण सर्दी ही आठवडाभर असतेच. पण कोव्हिडच्या या काळात सर्दी झाल्यास थोडी भीती वाटते. अशावेळी स्वयंपाकघरातील मसाल्यांचा उपयोग करुन काढा बनवा आणि रोज प्या. त्यामुळे तुम्हाला या त्रासांपासून सुटका मिळेल.
- कोव्हिड हा संसर्गजन्य असा आजार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्वच्छता बाळगा. खूप गर्दीची ठिकाणे जाणे टाळा. खाताना आण खाल्ल्यानंतर हात स्वच्छ धुवा.एखाद्या गोष्टीला पटकन हात लावायला जाऊ नका. एखाद्या व्यक्तिला त्याचा संसर्ग झाला असेल तर तो टाळता येईल.
- जर तुम्हाला ताप सर्दी खूप दिवसांपासून असेल तर तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांकडे जायला आणि टेस्ट करायला अजिबात टाळू नका.
अशा पद्धतीने Covid Care काळजी घेऊन तुम्ही कोरोनाला आपल्यापासून थोडे दूर ठेवू शकता.