BJP Roadshow अबकी बार 400 पार असा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि BJP नारा सगळ्यांनाच माहीत आहे. त्यासाठीच अनेक ठिकाणी सध्या शक्तिप्रदर्शन सुुरु आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी येणार आहेत. उद्या दिनांक 15 मे 2024 रोजी भव्य असा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यात ते सहभागी होणार आहे.
साडे सहा वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. त्यानंतर रोड शो हा ६.४५ मिनिटांनी सुरू होऊन तो ७.४५ ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.
नागरिकांना केले आवाहन
यावेळी मिहिर कोटेचा म्हणाले की,आपण सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी जरूर यावे. विकासपुरुष, देवपुरूष आणि युगपुरुष आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी येण्याचे आवाहन कोटेचा यांनी केले.