Mihir Kotecha मुंबईत येत्या सोमवारी सगळीकडे निवडणुका पार पडणार आहेत. अनेक ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्यातच ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचाMihir Kotecha यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. तर कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता दिसू येत आहे
भाजप नेत्यांनी दिली भेट
महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते नेते प्रसाद लाड कोटेचा यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान भाजपाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.यासंदर्भात बोलताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. “मिहीर कोटेचा यांच्या मुलूंडमधील कार्यालयावर जो हल्ला करण्यात आला, तो भ्याड हल्ला होता. यावेळी महिलांवरही हल्ला केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला करणे शिकवत नाही. संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे अशा प्रकाराचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. असा हल्ला सहन केला जाणार नाही. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पहिल्या दिवशीपासून हा घाबरलाय आणि गांगरलाय
मानखुर्दच्या जनाब संजय पाटलांनी जेव्हा आम्ही सर्व पंतप्रधान मोदीजींच्या सभेसाठी व्यस्त होतो.त्यावेळेस याने हा भेकड हल्ला केलाय. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.पहिल्या दिवशीपासून हा घाबरलाय आणि गांगरलाय म्हणूनच वारंवार गुंडागर्दी करून आमचं मनोबल तोडण्याचं प्रयत्न करतोय.पण आज पुन्हा सांगतो व शपथ घेतो की कितीही हल्ले किंवा फतवे निघाले तरी मानखुर्दला छत्रपती शिवाजी नगर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.- मिहिर कोटेचा Mihir Kotecha