Bigg Boss Marathi 5 नुकत्याच या सीझनची सुरुवात झाली आहे. तब्बल १ वर्षाचा ब्रेक घेऊन हा सीझन सुरु झाला आहे. यंदा होस्टच्या भूमिकेत रितेश देशमुख ( Riteish Deshmukh)आहे त्यामुळे राडा तर होणारच यात काही शंका नाही. या घरात अगदी पहिल्याच दिवसापासून बिग बॉसनी वेगवेगळ्या कसोट्या ठेवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सगळ्या स्पर्धकांची चांगलीच गोची होऊ लागली आहे. यातच पहिला दिवशी झालेला राडा हा आता कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हा राडा ज्येष्ठ अभिनेेत्री वर्षा उसगावकर विरुद्ध संपूर्ण घर असा काहीसा झालेला दिसत आहे.
वर्षा उसगावकर यांचा मेकअप
घरात पहिल्याच दिवशी पाणी घालवल्यामुळे अनेकांचे चांगलेच वांदे झाले आहेत. त्यात पाणी सोडल्यानंतर सगळ्यांनी आपआपली तयारी केली. पण या घरात बिग बॉसची ऑर्डर कोणीही टाळू शकत नाही. अशात ज्यावेळी घरातील सगळ्या सदस्यांना एकत्र येण्यासाठी सांगण्यात आले. त्यावेळी त्यांचे न ऐकता वर्षा उसगावकर या मेकअप करत बसल्याचे दिसत आहे. त्यांना घरातील अनेकांनी बोलावूनसुद्धा त्यांनी आपला मेकअप महत्वाचा असल्याचे दाखवून त्यांनी घरातील ऐकण्याचे सोडून त्यांनी आपला मेकअप करणे पसंत केले. आता अगदी पहिल्याच दिवशी असे केल्यामुळे अनेकांचा रोष वर्षा उसगावकर यांनी ओढवून घेतला आहे. या घरात काही नियम आहेत त्यांचे पालन न करता त्यांनी जे काही केले आहे. त्याची शिक्षा घरातील सगळ्यांना होणार आहे. त्यामुळे कोणाचा पारा चढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वर्षा उसगावकर यांच्याकडे आहे पॉवर कार्ड

वर्षा उसगावकर यांनी पॉवर कार्ड निवडले आहे. त्यांनी या घरात एक आठवडा काम न करण्याचे कार्ड निवडले आहे. त्यामुळे त्यांना एक वेगळाच आत्मविश्वास असल्याचे दिसत आहे. त्यांना हा खेळ नेमका कळला आहे की, त्या मुद्दाम असं करत आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांमध्ये उमटताना दिसत आहे.
दमदार खेळाडू
एक वर्षाच्या ब्रेकनंतर BB Marathi चा हा सीझन आला आहे. पण यंदा या खेळात चांगले दमदार खेळाडू आले आहेत. वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळी, निक्की तांबोळी,अंकिता प्रभू- वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल, निखिल दामले,आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील, वैभव चव्हाण, इरिना, धन: श्याम दरोडे, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, योगिता चव्हाण यांचा समावेश आहे.
आता या वीकेंडच्या वारला वर्षा उसगावकर यांना ओरडा पडणार की हे भांडण इथेच संपणार हे तर आता येणाऱ्या एपिसोडमध्ये समजेलच.