BramhaMuhurta हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. जे योगा करतात त्यांना याची माहिती नक्कीच असेल. पण ज्यांना योगाची संपूर्ण माहिती नाही अशांसाठी आजचा विषय हा नक्कीच खूप माहिती देणारा असेल. पहाटेची अशी वेळ जी अत्यंत शुभ आणि चांगली मानली जाते. या वेळी उठणे हे आरोग्यासाठी चांगले असते असे देखील अनेक ठिकाणी सांगण्यात आले आहेत. आताच नाही तर पुराणातदेखील याचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा ब्रम्हमुहूर्ताविषयी तुम्हाला माहिती असायला हवी.
ब्रम्हमुहूर्त म्हणजे काय?
खूप जणांना ब्रम्हमुहूर्त नेमका कोणता हे कळत नाही. जर तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला हे कळेल की, उजाडायच्या आधीचा जो काळ असतो. त्याला ब्रम्हमुहूर्त असे म्हणतात. साधारणपणे 1 तास 36 मिनिटांचा हा काळ असतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही सकाळी लवकर उठता म्हणजे ब्रम्हमुहूर्तावर उठता तर असे अजिबात नाही. तर सूर्य उगवण्याच्या आधीचा काळ हा ब्रम्हमुहूर्त असतो.
ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे फायदे BramhaMuhurta
ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. हे फायदे वाचाल तर तुम्ही देखील आजपासूनच ही सवय लावून घ्याल
- ब्रम्हमुहूर्ताच्यावेळी वातावरण अत्यंत शांत आणि सकारात्मक असते. या काळात जर तुम्ही ध्यानधारणा केली तर तुमचे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. तुमच्याकडून अधिक चांगली काम होण्यास मदत होते.
- तीन गुणांपैकी सत्व गुणांची वाढ झाली तर तुम्हाला अधिक फायदे मिळण्यास मदत होते. पहाटेच्या या काळात सत्व गुणांना अधिक चालना मिळते.
- मानवी शरीराच्या तीन प्रवृत्ती असतात. वात, पित्त, कफ प्रवृत्ती असलेल्यांसाठी BramhaMuhurta हा अत्यंत शुभ मानला जातो. ज्यांना वातदोष आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला मानला जातो.
- शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी देखील हा काळ चांगला आहे. जर या वेळात तुम्ही ध्यानधारणा केली तर तुमचे पोटाचे आरोग्य चांगले होण्यास मदत मिळते.
- सकाळच्या या वेळात सगळ्यात शुद्ध हवा असते. यात फिरायला गेलात तर शरीरात जास्तीत जास्त शुद्ध हवा जाते. जी आरोग्यासाठी चांगली मानली जाते.
- ज्यांना लवकर झोप येत नाही अशांनी BramhaMuhurtaवर नक्की उठावे. ही सवय लावल्यामुळे त्यांची झोप सुधारते. शिवाय त्यांना या काळातील अनेक फायदे देखील मिळतात.
- सकाळच्या या वेळात विचार देखील स्थिर असतात. एखादे महत्वाचे काम करायचे असेल तर रात्री जागण्यापेक्षा ते या वेळात करावे नक्कीच फायदा होतो.
BramhaMuhurta वर उठण्याचे अनेक फायदे आहेत. ते तुम्ही नक्की अनुभवायला हवेत.
Diwali 2023| दिवाळीसंदर्भातील अत्यंत महत्वाची माहिती, पूजाविधी आणि मुहूर्त