टक्कल पडण्याची कारणं आणि उपायटक्कल पडण्याची कारणं आणि उपाय

Bald Head Reason मागे अनेक कारणं असू शकतात. पण आताच्या या काळात खूपच कमी जणांना टक्कल पडते. त्यामुळे जर एखाद्याला टक्कल असेल तर खूप जणांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. टेक्नॉलॉजीच्या या काळात आता कोणालाच याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. जर आपण टक्कल पडण्याची कारणं जाणून घेतली तर त्यावर योग्यवेळी आणि योग्य उपचार करणे हे फारच सोपे जाईल. त्यामुळे आजचा हा माहितीपर लेख नक्की वाचा.

टक्कल पडण्याची कारणे Bald Head Reason

टक्कल पडण्यामागे अनेक कारणं असू शकतात. प्रत्येकाच्या बाबतीत ही परिस्थिती वेगवेगळी असू शकते. आता तुमचे कशामुळे केस गेले याचेही काही कारण असू शकते. ते कारण आधी जाणून घ्या.

5+Coconut Oil | ओठांसाठी असा करा नारळाच्या तेलाचा वापर

  1. अनुवंशिकता हे सगळ्यात मोठे आणि पहिले कारण असू शकते. खूप जणांच्या घरात टक्कल पडण्याची परंपरा असते. जर तुम्ही ही ते जीन कॅरी केले असेल तर तुम्हाला तसे टक्कल पडू शकते. पण जर तुम्ही योग्यवेळी काळजी घेतली तर तुमचे केस लवकर जाणार नाहीत.
  2. हार्मोनल बदल हे देखील तुमच्या केसगळतीसाठी कारणीभूत ठरु शकते. खूप जणांना केसगळतीची समस्या ही डिलीव्हरीनंतर सुरु होते. प्रेग्नंसी आणि त्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलाचे हे परिणाम असतात. पण अशी केसगळती योग्य ती निगा राखून कमी करता येऊ शकते.
  3. काही औषधांमुळे आणि उपचारांमुळेही डोक्यावरील केस जातात. कॅन्सरसारख्या आजारावर घेतली जाणारी केमोथेरपी यामुळे तर महिला आणि पुरुष दोघांनाही टक्कल पडते.
  4. आपल्या शरीरात वयोमानानुसार काही बदल होत असतात. यामध्ये शरीरात वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्सची कमतरता होते. त्यामुळेही त्याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो.
  5. केसांची हेअरस्टाईल ही देखील केसगळतीसाठी कारणीभूत ठरु शकते. जर तुम्ही केस खूपच घट्ट बांधत असाल तर त्यामुळेही तुमचे केस तुटू शकतात . त्या ठिकाणी टक्कल पडू शकते.

टक्कल पडण्यावर उपाय

टक्कल पडले आहे म्हणून खचून जाऊ नका. हल्लीच्या काळात अनेक उपचारपद्धती सहज उपलब्ध आहेत. तुमच्या खिशाला परवडेल त्या पद्धतीचा तुम्ही अवलंब करु शकता.

  1. केसांची चांगली वाढ आणि ते टिकणे केवळ तुमच्या चांगल्या सवयींवर अवलंबून असते तुम्ही कितीही वरुन तेल लावले तरी त्याने तुम्हाला फायदा होणार नाही. पण तुम्ही संतुलित आहार घेण्यास सुरुवात कराल तर तुम्हाला तुमच्या केसांत झालेला बदल नक्कीच हवाहवासा वाटेल.
  2. हार्मोनल बदलामुळे होणारी केसगळतीही योग्य सल्ल्याने नियंत्रणात आणता येते. वाढलेले वजन, अतिरिक्त चरबी या सगळ्याचा परिणाम हा आपल्या केसांवर होतो. ते नियंत्रणात आले की, अनेक गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात.
  3. हल्ल केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी काही थेरपीज केल्या जातात. जे तुमच्या केसांच्या पोअर्समधून नवे केस येण्यासाठी मदत करतात. अशा ट्रिटमेंट या सेफ असतात त्या करण्यास काहीच हरकत नाही.
  4. केसांसाठी आवश्यक असलेले घटक जसे की, बायोटीन आणि काही विटॅमिन तुम्हाला आहारातून जास्तीत जास्त मिळतील याचा प्रयत्न करा.
  5. केसांसाठी स्वस्त शॅम्पू वापरण्यापेक्षा चांगले आणि उत्तम शॅम्पू निवडा. ज्यामुळेही टक्कल पडणे नियंत्रणात येऊ शकते.

आता हे काही सोपे उपाय Bald Head Reason करायला अजिबात विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *