सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ‘स्त्री प्रधान’ चित्रपटांचा बोलबाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकताच प्रदर्शित झालेला ‘नाच गं घुमा’ असो किंवा त्याआधी आलेले ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘बाईपण भारी देवा’ या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला. अनेक नवीन रेकॉर्ड्स बनवले आणि मराठी प्रेक्षकांच्या मनाला भुरळही घातली. अशातच आता एक नवा स्त्री प्रधान सिनेमा आल्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत ६ स्त्री कलाकार धमाल करायला सज्ज आहेत. नुकतंच या सिनेमाचं फ्रेश पोस्टर रिलीज झालं असून, सगळीकडे याचीच चर्चा रंगते आहे.
नवा चित्रपट ‘बाई गं’ लवकरच भेटीला येणार…
‘बाई गं’ या आगामी चित्रपटात अभिनेता स्वप्निल जोशी सोबत सुकन्या मोने-कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा एक से एक ६ दमदार अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत आहेत. सोबतच चला हवा येऊद्या फेम अभिनेता सागर कारंडे देखील या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवं धमाकेदार पोस्टर रिलीज झालं असून सर्वत्र त्याचाच बोलबाला आहे.
नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ हा नवा चित्रपट येत्या १२ जुलैला प्रदर्शित होत आहे.
