Aapla Dawakhana |अल्पावधीतच जनसेवेच्या कार्यामुळे लोकप्रिय झालेली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना योजना’ महापालिका राबवत आहे. या योजनेचे गांभीर्य, कल्पकता आणि उपयोगिता लक्षात घेता जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत तब्बल 20 ‘आपला दवाखाना’चे उद्घाटन केले होते.’ आपला दवाखाना’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, औषधे, तपासणी आणि निदान यांसारख्या अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविते.
या दवाखान्यांची लोकप्रियता लक्षात घेता आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्तांकडे एक विशेष मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबईत आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत आणि रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत दवाखाने सुरु ठेवावेत. मुंबईतील चाकरमानी कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करतात आणि संध्याकाळी 7 नंतरच घरी पोहोचू शकतात. मुंबईचा कणा आणि शहराच्या प्रगतीचे इंजिन असलेल्या कामगार वर्गासाठी संध्याकाळी 5 पूर्वी डॉक्टरांना भेटणे शक्य नाही. महापालिका ही यशस्वी मोफत आरोग्य सेवा चालवत असल्याने, जिथे उपचार आणि निदान आणि अगदी औषधोपचार दोन्ही मोफत आहेत, ते दवाखाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवले तर कामगार वर्गालाही त्याचा अधिक लाभ घेता येईल.
https://www.instagram.com/p/Cu_QCuvtR3Q/?img_index=1
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या योजनेतून अनेकांना फायदा होत आहे. अन्य नागरिकांनाही मिळावा यासाठी आमदार योगेश सागर यांनी ही मागणी केली आहे.