AlaskaPox Virus | कोरोना वायरसनंतर आताच्या आता अनेक व्हायरस जगभरात येऊन गेले. त्यानंतर अनेक आजारांनी डोकं वर काढलं. चायनातून आलेला कोरोना आणि त्याचे भयावह परिणाम आतापर्यंत आपण सगळ्यांनीच अनुभवले आहेत. तोच आता आणखी एका व्हायरसची चर्चा होऊ लागली आहे. तो म्हणजे AlaskaPox Virus या व्हायरसमुळे अमेरिकेत काही जणांना त्रास होऊ लागल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर त्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. या व्हायरसची लागण अगदी हातावर मोजता येतील इतक्या लोकांना झाली असली तरी देखील याचा परिणाम गंभीर असल्याचे दिसून आले आहे. नेमकं AlaskaPox Virus आहे तरी काय? चला जाणून घेऊया या विषयी अधिक
How To Get Over Mental Stress | मानसिक तणावातून असे व्हा मुक्त
AlaskaPox Virus आहे तरी काय?
अमेरिकेच्या फेरेक्सबँकमध्ये याचे काही रुग्ण आढळून आले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या अधिक तपासणीत हा व्हायरस सस्तन प्राण्यांपासून पसरतो आहे असे दिसून आले आहे. हा थेट प्राण्यांपासून मानवी शरीरात येतोय असे नाही. तर मृत झालेल्या रुग्णाच्या तपासणीत त्याला हा आजार मांजराकडून आल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला मांजराने ओरबाडले होते. त्यातून हा वायरस शरीरात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे. परंतु या व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमााणावर झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. साधारण चिकनपॉक्स, काऊपॉक्सपेक्षा थोडे मोठे असल्याने याला अलास्कापॉक्स असे नाव ठेवण्यात आले आहे.
AlaskaPox Virus लक्षणे
AlaskaPox Virus ची लक्षणे जाणून घेणे सध्या फारच जास्त गरजेचे आहे. यामध्ये अंगाला खाज येऊ लागते. त्यामुळे शरीराला सूज येते. लिम्फ नॉडमध्ये सूज येऊ लागते, प्रतिकारशक्ती कमी होते, सांधेदुखी होऊ लागते, मांसपेशी दुखायला लागतात, त्वचेवर जखम होऊ लागते.
AlaskaPox Virus संदर्भात ठोस अशी माहिती नसली तरी देखील याचा प्रसार होऊ नये याची काळजी अमेरिकेत घेतली जात आहे.