मृण्मयी देशपांडे हे नाव घेताच तिचा नैसर्गिक अभिनय आणि काळजात घर करणारे सुंदर ब्राऊन डोळे हेच समोर येतं. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने अनेकांना आपले चाहते केलंय. चित्रपट, नाटक, रियालिटी शो, ओटीटी कोणताही प्लॅटफॉर्म असो मृण्मयीचा वावर सर्वांनाच भावतो. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना दिसते. नुकतेच तिने अबोली रंगाच्या साडीत मनमोहक पोझ देत फोटो पोस्ट केले आहे.
मृण्मयीचा हा कमालीचा आकर्षक लुक चाहत्यांना भावला असून तिची ही साधी सोबर मात्र कलिजा खलास करणारी स्टाईल तुम्हालाही कॅरी करता येईल. पाहा मृण्मयीचे मनमोहक लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
बारीक गोल्डन काठ असणारी ट्रान्सपरंट अशी अबोली रंगाची साडी मृण्मयीने नेसली असून यावर बारीक गोल्डन बुट्टीही दिसून येत आहे. या साडीसह मृण्मयीने गोल्डन स्लिव्हलेस ब्लाऊज मॅच केला असून आधुनिकता आणि मॉडर्नपणाचा उत्तम मेळ साधला आहे. तिचा हा लुक अत्यंत क्लासी दिसत आहे. तिने या साडीसह साधी लांबसडक वेणीची हेअरस्टाईल केली असून खूपच आकर्षक आणि लक्षवेधी दिसून येत आहे. मृण्मयीच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाहीये. या साडीसह तिने मोत्याचे कानातले आणि साधा लांबसडक नेकलेस घातला असून तिचा हा लुक कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही सहज कॅरी करू शकता. तिने यासह मोठी लाल टिकली लावली असून स्मोकी आईज लुक केलाय. आयशॅडो, हायलायटर, काजळ, आयलॅशेस आणि गुलाबी न्यूड लिपस्टिकचा आधार घेत मेकअप केलाय.