दीपिका पादुकोण होणार आईदीपिका पादुकोण होणार आई

#Deepveer च्या लग्नांपासून त्यांचे चाहते त्यांचा गुडन्यूजची वाट पाहात आहे. त्यांच्या लग्नानंतर काही वर्ष फॅन्सनी याचा पाठपुरावा देखील केला असेल. परंतु आता कोणाच्याही ध्यानी मनी नसताना एका गोड बातमीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणवीर सिंह – दीपिका पदुकोण यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची त्यांनी नुकतीच पोस्ट केली आहे. याचा अर्थ नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही गुडन्यूज त्यांना मिळाली असेल यात काही शंका नाही. आता दीपिकाच्या बेबी बंप पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे.

एअरपोर्ट लुक म्हणून होता असा

दीपिका तिच्या एअरपोर्ट लुकसाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. ती नेहमीच ट्रेंडी कपडे घालते. पण गेल्या काही महिन्यांपासून तिचे व्हिडिओ पाहिले असतील तर ती खूप सैल आणि मोठे कपडे घालताना दिसली आहे. ती फोटो पोझ देतानाही खूप काळजी घेते असे देखील खूप जणांना लक्षात आले असेल. खूप जणांना ती प्रेग्नंट आहे असे वाटत होते. परंतु तिने कधीच तसे दाखवले नाही. अखेर या दोघांनी पोस्ट केल्यानंतर या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

बाळाची उत्सुकता

दीपिका ही जगातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची मुलं कशी असतील अशी खूप जणांना उत्सुकता होती. आता ही गुड न्यूज मिळाल्यानंतर पापाराझीसाठी तिला पाहणे हे फारच जास्त मह्तवाचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *