सिद्धार्थ बोडके-तितिक्षा तावडे अडकले लग्नबंधनातसिद्धार्थ बोडके-तितिक्षा तावडे अडकले लग्नबंधनात

Titiksha Tawade मराठी अभिनेत्री आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके, आज विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तितिक्षाच्या लग्नाची चर्चा होत होती. अखेर तिच्या इन्स्टाच्या पोस्टवरुन तिच्या लग्नाची अप टू डेट माहिती आता तिच्या चाहत्यांना मिळत आहे. अनेक मराठी मालिकांमधून प्रसिद्ध झालेली तितिक्षा दृश्यम फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत विवाहबद्ध झाली आहे. तिचे फोटो पाहून अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर केला आहे.

दगडूला मिळाली त्याची रिअल लाईफ प्राजू, पाहा अभिनेता प्रथमेश परबच्या साखरपुड्याचे फोटोज

एकत्र केले होते काम

आता सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांच्या लव्हस्टोरीविषयी आपल्याला नेहमीच अधिक जाणून घ्यायचे असते. तितिक्षा आणि सिद्धार्थ यांनी एका मालिकेत काम केले होते. ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. परंतु त्यांची अशी काही लव्हस्टोरी होती हे काही कोणाला उघड उघड माहीत नव्हते. या आधीत तितिक्षाने तिच्या इन्स्टावर दोघांचे अनेक फोटोज, व्हिडिओज शेअर केले होते. पण त्याची चर्चा फारशी झाली नव्हती. तितिक्षाच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

असा होता तितिक्षाचा लुक

तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लुकची चर्चाही तितकीच होत आहे. त्यांच्या लग्नातील त्यांचे लुक हे एकदम फ्रेश आणि तितकेच स्टायलिश आहेत. त्यांच्या या लग्नसोहळ्यासाठी त्यांनी पेस्टल कलरचा जास्तीत जास्त उपयोग केल्याचे दिसून येत आहे. त्यात त्यांचा लुक अधिक खुलून आलेला दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *