Credit Card असणं हे आताच्या काळात अनेकांसाठी फायद्याचे ठरते. काही काळासाठी मिळणारे उसने पैसे चांगल्या कामासाठी, एखादी मोठी वस्तू EMI ने घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील त्याचे काही नुकसान देखील आहेत. क्रेडिट कार्ड जसे तुम्हाला स्वातंत्र्य देते तसेच तुम्हाला त्याचा वापर हा फार जपून करणे गरजेचे असते. आज आपण क्रेडिट कार्ड संदर्भातील अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत. जेणेकरुन क्रेडिट कार्ड घेणार असाल किंवा तुमच्याकडे असेल तर त्याचा योग्य वापर करणे सोपे जाईल.
क्रेडिट लिमिट घ्या जाणून
तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्यावर त्याचे विविध फायदे लिहिलेले असतात. प्रत्येक कार्डाची एक लिमिट असते. म्हणजे क्षमता. अगदी लाख रुपयांपासून हे कार्ड तुम्हाला मिळत असते. त्यामध्ये तुम्हाला किती स्वाईप करता येईल. महिन्याला किती खर्च करता येईल हे दिसते. शिवाय नेटबँकिंगच्या माध्यमातून तुम्ही काही सेटिंग करु शकता. जेणेकरुन तुम्हाला त्याचा वापर कसा होतोय हे कळू शकतो. शिवाय खर्चांवरही निर्बंध लावता येतो.
क्षुल्लक गोष्टींवर करु नका खर्च
कधी कधी क्रेडिट कार्ड क्षुल्लक गोष्टींसाठी वापरले जाते. पण तेच मुळात टाळायचे आहे. क्रेडिट कार्डचा उपयोग हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी करा कारण या वस्तू महाग असतात. शिवाय त्याच्या स्वाईपवर तुम्हाला विविध ऑफर्सही मिळतात. थेट कॅशने काही गोष्टी घेण्यापेक्षा क्रेडिट कार्डचा उपयोग करुन घेतल्या तर त्याचा EMI देखील करता येतो. त्यामुळे पैशांचे नियोजन करणे सोपे जाते.
Share Market | शेअर मार्केटचे योग्य ज्ञान आणि व्हाल मालामाल
योग्य वेळी भरा बिल
क्रेडिट कार्डचे बिल हे तुम्ही योग्यवेळी भरणे गरजेचे असते. त्यावर तुमचा सिबिल स्कोअर अवलंबून असतो. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर क्रेडिट कार्डचा वापर योग्य करता आला पाहिजे. पूर्ण क्रेडिट वापरणे आणि अति खर्च करणे त्यामुळे तुम्ही रिस्क कॅटेगिरीमध्ये जाता. शिवाय तुम्ही बिल जर पूर्ण न भरता अर्धे अर्धे भरले तरी देखील तुमच्यावरील विश्वास हा कमी होतो.
उगीच क्रेडिट कार्ड घेऊ नका
मॉल किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड हवे का? अशी विचारणा केली जाते. परंतु कुठेही क्रेडिट कार्ड काढताना थोडे सावधान! कारण त्यामध्येही काही नियम असतात. जे तुम्हाला संपूर्ण जाणून घेऊन मगच काढायचे आहे. उगाचच घाई करुन आणि गरज नसताना क्रेडिट कार्ड काढू नका. काढायचे असेल बँकेत चौकशी करुनच घ्या.
आता क्रेडिट कार्ड काढताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.