सचिन तेंडुलकर निवडणुक आयोगाचा नवा चेहरासचिन तेंडुलकर निवडणुक आयोगाचा नवा चेहरा

मतदान हा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार आहे. हे माहीत असूनही आपल्याकडे होणाऱ्या निवडणुकीत अनेकदा मतदानाचा अधिकार बजावण्याची जबाबदारी खूपच कमी जण पार पाडतात. तरुणांनी आणि मतदानाचा अधिकार प्राप्त झालेल्या सगळ्यांनीच मतदानाची जबाबदारी ओळखण्यासाठी अनेकांच्या गळ्याचे ताईत असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निवडणुक आयोगाचे नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

येत्या 2024 मध्ये देशभरात निवडणुका पार पडणार आहेत. लोकशाही असलेल्या आपल्या या देशात मतदान हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे. तो सगळ्यांनी बजावायला हवा. याची जाणीव करुन देण्यासाठीच सचिन तेंडुलकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. मतदारांचा सहभाग अधिकाधिक वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील 3 वर्षांसाठी सचिनसोबत करार करण्यात आला आहे.

यावेळी सचिन याने सांगितले की, भारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरुणांची राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प्रोत्साहन देताना, इंडिया..इंडिया असा जयघोष करणारी ‘टिम इंडिया’ समृद्ध लोकशाहीला पुढे नेण्यासाठी नक्कीच समोर येईल. त्यासाठी सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मतदानाचा हक्क बजावणे. ज्याप्रमाणे एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियमवर  गर्दी जमते. त्याप्रमाणेच प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रावरही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी आणि उत्साह कायम ठेवू या, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण मतदार निवडणुकीत सहभागी होणार, तेव्हाच आपला देश अधिक समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करेल.

सचिन तेंडुलकर निवडणुक आयोगाचा नवा आयकॉन

यावेळी निवडणुक मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, सचिन तेंडुलकर भारताचेच नव्हे, तर जागतिक स्तरावरील आदणीय खेळाडू व्यक्त‍िमत्व आहे. त्यांची क्रिकेटची संपूर्ण कारकीर्द प्रशंसनीय आणि उल्लेखनीय राहिलेली आहे. यामुळेच ईसीआयने मतदारांची संख्या वाढविण्यासाठी ते एक आदर्श पर्याय ठरतील. या तीन वर्षांमध्ये विविध दूरचित्रवाणी वरील टॉक शो, कार्यक्रम आणि डिजिटल मोहिमांद्वारे तेंडुलकर मतदारांमध्ये मतदानाविषयी प्रचार-प्रसार करतील. यामाध्यमातून मतदानाचे महत्व आणि देशाच्या भवितव्यासाठी ते किती महत्वाचे आहे हे मतदारांना पटवून सांगतील.

यापूर्वी भारतीय निवडणुक आयोगाने विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते आमीर खान, पंकज त्रिपाठी, खेळाडू मेरी कोम, एम.एस. धोनी यांना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *