तिळगुळ घ्या गोड गोड बोलातिळगुळ घ्या गोड गोड बोला

Tilgul Recipe मकरसंक्रात आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवशी तिळाचे पदार्थ अगदी आवर्जून खाल्ले जातात. यापूर्वी आपण तिळाचे फायदे आपण जाणून घेतले आहेत. आता या तिळापासून आपल्याला लाडू कसे बनवता येतील त्याविषयी आपण जाणून घेऊया. संक्रातीच्या दिवशी तिळापासून तिळवडी, तिळाचे लाडू बनवले जातात. खूप जणांचे लाडू हे टणक आणि खाता न येण्यासारखे असल्यामुळे त्याची मजाच येत नाही. जर तुमचेही लाडू काही कारणास्तव बिनसत असतील तर आज खास तुमच्यासाठी आम्ही तिळाचे लाडू रेसिपी शेअर करत आहोत.

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा

असे बनवा तिळाचे परफेक्ट लाडू Tilgul Recipe

तिळाचे लाडू बनवण्यासाठी तिळ आणि गूळ हा चांगल्या प्रतीचा घ्यावा लागतो. शिवाय ते शिजवतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने ते केले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो.

  1. बाजारात पॉलिश किंवा बिनापॉलिश केलेले तिळ मिळतात. पॉलिश तिळ हे चकचकीत असतात ज्यामुळे तुम्ही केलेले लाडू हे चमकतात. तर बिनापॉलिश केलेल्या तिळाचे लाडू थोडेसे काळपट दिसतात. पण तिळ निवड ही सर्वस्वी तुमची आहे.
  2. गूळ निवडताना मात्र तुम्ही बाजारात मिळणारा चिक्कीचा गूळ निवडावा. कारण या गुळामुळे एक चांगला चिकटपणा त्याला येतो.
  3. आता लाडू करण्याआधी तिळ चांगले स्वच्छ करुन घ्या. त्यात दगड असतील तर ते काढून घ्या. तिळाच्या लाडूमध्ये डाळं ही देखील एक छान चव आणतात. कोणत्याही ड्रायफ्रुटपेक्षा त्याला अधिक चव असते.
  4. एका स्वच्छ कढईत तिळ चांगले उडेपर्यंत भाजून घ्या. मंद आचेवर तिळ भाजा ते कुरकुरीत होणे जास्त गरजेचे आहे. तिळ जुने असतील तर ते खवट तर नाही ना हे तपासा
  5. तिळ चांगले भाजून झाल्यावर ते एका बाजूला काढून ठेवा. त्यानंतर डाळं चांगली भाजून घ्या.
  6. आता त्याच कढईत थोडे तूप आणि गूळ टाकून तो वितळून घ्या. मंद आचेवर हे सगळे करायचे आहे. त्यामुळे थोडा वेळ यासाठी लागू शकतो. गूळाचा पाक गोळी तयार व्हायला हवा. (यासाठी गूळ चांगले वितळल्यानंतर साधारण 5 मिनिटे तसेच परतत राहा. एका वाटीत पाणी घेऊन त्यात थोडासा पाक टाका. त्या पाकाची गोळी तयार होत असेल तर गोळी पाक तयार झाला आहे असे समजा.)
  7. आता त्या पाकात तुम्ही तिळ आणि डाळं घालून एकत्र करा. हाताला तूपाचा हात लावून तुम्ही लाडू वळा. तुमचे परफेक्ट तिळाचे लाडू तयार आहेत.
  8. जर तुम्हाला लाडू न बनवता जर वडी तयार करायची असेल तर ताटाला तूप लावून हे सारण पसरवा. त्याला आधीच सुरीने कापांचा आकार द्या. ते पूर्ण सुकू द्या आणि सुकल्यावर त्याच्या वड्या पाडा.

आत तुम्ही बाहेरुन तिळाचे लाडू आणण्यापेक्षा घरीच परफेक्ट असे तिळाचे लाडू बनवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *