Back Pain पाठीचे दुखणे हे आपल्यापैकी कित्येकांना असते. पण सतत पाठीचे दुखणे हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण या गोष्टी आपल्या आरोग्याशी निगडीत काही संकेत देत असतात. आपल्यापैकी खूप जण याकडे सतत दुर्लक्ष करतात. पण असे करणे आरोग्यासाठी घातक ठरते हे काही गोष्टी झाल्यावर लक्षात येते. जर तुमची पाठ ही साधारण आठवड्याहून अधिक काळ काहीही न करता दुखत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. इतकेच नाही तर तुम्ही त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील गरजेेचे असते. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या काही शारीरिक समस्या आधीच टाळता येतील.
Covid Care | कोरोनाची लागण होऊ नये यासाठी अशी घ्या काळजी
Anemia | ॲनिमिया म्हणजे काय? लक्षणे आणि उपाय
Back Pain नक्की कसले देतात संकेत
जर तुम्हाला सतत पाठदुखी होत असेल तर तुम्हाला तुमचे शरीर काही संकेत देत असते. ते संकेत दुर्लक्ष करुन चालत नाही. नेमकी यामागे कोणती कारणे असून शकतात आणि त्यांचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे आता आपण जाणून घेऊया.
- काही कारणामुळे आपली पाठ जर दुखावली गेली असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या संपूर्ण कामकाजावर होत असतो. जर पाठीचे दुखणे केवळ बाम लावून बरे होत नसेल आणि ते कित्येक दिवसांसाठी तसेच राहिले असेल तर त्यामुळे तुमच्या चालण्यावर, बसण्यावर परिणाम होऊ लागतो. तुमचे शरीर लगेचच आखडून जाते. याचा परिणाम तुमच्या पर्सनॅलिटीवर होतो. त्यामुळे वेळीच पाठीच्या दुखण्याकडे लक्ष द्या.
- अनेकदा आपल्या शरीराची होणारी दुखापत ही आपल्यावर असलेल्या ताणाचे देखील लक्षण असते. जर तुम्ही नैराश्यात असाल तरी त्याचा परिणाम हा तुमच्या पाठीवर होत असतो. पाठदुखीच्या तक्रारी घेऊन अनेक जण येतात. पण त्यांना नैराश्य आहे किंवा स्ट्रेस आहे हे त्यांना अजिबात माहीत नसते.
- पाठदुखीचा परिणाम हा तुमच्यावर सेक्सलाईफवर देखील होतो. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही असमर्थ ठरलात तर त्यामुळे ही तुमच्या मनावर आणि नात्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे योग्य वेळी त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
- पाठीचे दुखणे हे ह्रदयाच्या आरोग्यासाठीही चांगले मानले जात नाही. ज्यावेळी ह्रदयविकाराचा झटका येणार असतो. त्याआधी तुमचे शरीर तुम्हाला विविध संकेत देत असते. त्यापैकी एक म्हणजे पाठदुखी. सततची पाठदुखी ही तुमच्या शरीरातील रक्तदाब वाढवत असते. ज्याचा ताण ह्रदयावर होत असतो.
आता जर तुम्हाला Back Pain होत असेल तर तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.