Govardhan Eco Village | कृष्ण भक्त असाल आणि तुम्हाला खूप दिवसांपासून वृदांवनला जाण्याची इच्छा असेल पण काही कारणास्तव इतका मोठा प्लॅन करणे शक्य नसेल तर महाराष्ट्रात वृदांवनसारखेच एक ठिकाणी आहे जिथे गेल्यानंतर तुम्हाला वृदांवनला आल्यासारखे वाटेल. इथे अगदी वृदांवनासारखेच वातावरण आहे. याच्या चराचरात श्रीकृष्णाचा वास आहे असे इथे आलेल्या प्रत्येकाला जाणवते. हे ठिकाण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गालथरे येथील हमरापूर गावात हे वसलेले आहे. आज आपण या स्थानाची अधिक माहिती घेऊयात म्हणजे तुम्हाला तुमची पुढची ट्रिप येथे नक्कीच करता येईल.
Ujjain Mahakaleshwar | वाचा उज्जैन महाकालेश्वरची कथा, अशी प्लॅन करा टूर 2024
गोवर्धन इको व्हिलेज Govardhan Eco Village

तर या जागेचे नाव आहे गोवर्धन इको व्हिलेज. वृदांवनच्या थीमवर आधारीत असलेले हे ठिकाण आहे. येथे येण्यासाठी तुम्हाला खूप खर्च येतो असेही नाही. तुम्ही पहाटे लवकर वाड्यासाठी बस पकडून तुम्हाला हमरापूर या गावी यायचे आहे. ठाण्यातून वाड्याला जाण्यासाठी तासातासाने एसटी सुटतात. याशिवाय तुम्ही थेट गाडी देखील येथे करुन जाऊ शकता. हमरापूर या गावापासून तुम्हाला गोवर्धन इको व्हिलेजला जाण्यासाठी शेअर रिक्षा मिळतात. त्या रिक्षाने तुम्ही येथे जा आणि आपला संपूर्ण दिवस तुम्ही येथे घालवा. येथे आल्यानंतर तुम्हाला एक कमालीची शांतता जाणवेल. येथे वृदांवन उभारले आहे. तेथे जाण्यासाठी तुम्हाला एक कुपन घ्यावे लागते. तेथेच गाईड देखील असतात. ते ठराविक संख्या जमली की, तुम्हाला आत घेऊन जातात. तुम्हाला संपूर्ण वृदांवन दाखवतात. येथे कृष्ण जन्म आणि महत्वाच्या घटनांचा देखावा तयार केला आहे. येथील झाडं आणि तेथील फुलपाखरे पाहण्याचा आनंद एक वेगळाच आहे.
या परिसरात एक मुख्य मंदिर आहे. जेथे कमालीचा थंडावा आहे. तेथे तुम्ही राधा कृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन तेथेच ध्यान धारणा करु शकता. जर तुम्हाला येथे योगाचा अभ्यास करायचा असेल तर येथे चौकशी करु शकता.
सात्विक जेवणाचा आनंद
या ठिकाणी आल्यानंतर आणि येथील संपूर्ण परिसर फिरल्यानंतर तुम्हाला भूक नक्कीच लागेल. तेव्हा येथे सात्विक जेवणाचा आनंद घेऊ शकता. येथे उत्तम व्हेज जेवण माफक दरात तुम्हाला मिळेल. त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय अजिबात परतू नका. शिवाय तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या देखील येथून नक्कीच घ्या. गावकरी येथे ताज्या भाज्या विकायला आणतात. त्या देखील त्यांच्याकडून घ्या.
एखादा वीकेंड पकडून तुम्ही येथे या. जर तुम्हाला राहायचे असेल तर त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करु शकता.