इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला जाणारा असा आजचा दिवस आहे. कारण चंद्रयान 1 आणि 2 च्या अथक प्रयत्नानंतर चंद्रयान 3 चे मिशन पूर्ण झाले आहे. चंद्रयान 3 च्या विक्रम लँडरने आपली पावले चंद्रावर यशस्वीरित्या रोवली आहे. त्यामुळे आता चंद्राचा अभ्यास अधिक जवळून करणे भारताला सोपे जाणार आहे. आतापर्यंत चंद्रावर जाऊन त्याचा अभ्यास करण्याचे प्रयत्न अनेक देशांनी केले आहेत. अनेक देशांनी चंद्रावर सॉफ्ट लँडींगदेखील केले आहे. पण चंद्राच्या दक्षिण भागात लँड करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
चंद्रयान 2 ची मोहीम 2019 साली करण्यात आली होती. पण चंद्रावर उतरताना समस्या आल्यामुळे त्याचे लँडीग नीट होऊ शकले नव्हते. त्यावेळीही त्या यानाने चंद्राचे काही फोटो पाठवले होते. त्यामुळे चंद्र कसा दिसतो हे कळले होते. पण चंद्राचा अभ्यास हा अधिक महत्वाचा भाग ते करु शकले नाही. त्यामुळे भारताच्या पदरी निराशा आली होती. पण पुन्हा 4 वर्षानंतर आधुनिक प्रणालीचा वापर करत चंद्रावर यशस्वीरित्या उतरण्यात इस्त्रो ( Indian Space Research Organisation) ला यश आले आहे.
14 दिवस करणार अभ्यास

चंद्रावर विक्रम लँडर तब्बल 14 दिवस काम करणार आहे. त्याचे चंद्रावरील जीवन हे या कालावधीपुरते असणार आहे. एक चंद्रदिवस हा पृथ्वीच्या दृष्टिकोनातून 14 दिवसांचा असणार आहे. यामध्ये यान तेथे प्रयोगही करणार आहे. चंद्रावरील विविध गोष्टींचा अभ्यास करुन ती माहिती पुरवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्र हा ग्रह अधिक जवळून समजणे शक्य होणार आहे.
विक्रम लँडरला दिसला रुसचा लुना
चंद्रावरील मोहिमेसाठी अनेक देशांनी प्रयत्न केले आहेत. रुसने देखील चांद्रमोहिमेसाठी त्यांचे लुना नावाचे यान पाठवले होते. ते चंद्राच्या कक्षेत आल्यानंतर त्याचा संपर्क तुटला आणि चंद्रावरच स्फोट होऊन पडले. त्यामुळे रुसचा चंद्रावर सॉफ्ट लँडींग करण्याचा प्रयत्न फोल ठरला होता. त्यानंतर 2023 मध्ये भारत चंद्रयान 3 करणार याची माहिती देण्यात आली होती. चंद्रावर सॉफ्ट लँडींग करणे हे आपले ध्येय होते. कारण चंद्रयान 2 सॉफ्ट लँडींग करण्यात अयशस्वी ठरले होते. चंद्रयान 3 कडून अनेक अपेक्षा होत्या. मागे झालेल्या चुका सुधारण्यात आल्या होत्या. चंद्राच्या कक्षेत आल्यानंतर यानाचे लँडींग होईपर्यंतचा त्याचा वेग कमी करण्यात आला होता. त्यामुळे लँडींग सोपे झाले. पण ज्यावेळी यान चंद्राच्या कक्षेत फिरत होते. त्यावेळी त्याला चंद्रयान 1,2 दिसले शिवाय रुसने पाठवलेले लुना या यानाचे भागही दिसले होते.
आता लवकरच विक्रम लँडर चंद्रासंदर्भात अनेक माहिती पाठवेल आणि भारतीयांची मान अधिक उंचावेल अशी अपेक्षा आहे.