Sunil Kedar यांना बँक घोटाळा प्रकरणी शुक्रवारी न्यायालयाने 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ज्या बँकेत घोटाळा झाला त्या बँकेत ते अध्यक्ष पदावर होते. अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्यात बुडाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर खटले जाहीर करण्यात आले होते. त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची प्रकृति खराब झाल्याची माहिती समोर आली आहे.
तब्बल 21 वर्षानंतर ज्यांचे पैसे यात बुडाले त्यांना न्याय देणारी बातमी आली. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. परंतु ही शिक्षा सुनावल्यानंतर सुनील केदार यांची तब्येत अचानक ढासळली. त्यांचा इसीजी करण्यात आला. त्यात त्यांचा हार्टरेट हा कमी झाला होता. त्यामुळे त्यांना त्वरीत आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
परंतु सध्या त्यांच्या आमदारकीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.